ऐन दिवाळीत एसटी बस बंदमुळे प्रवाशांचे हाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:23 AM2017-10-18T01:23:55+5:302017-10-18T01:24:32+5:30
सिंदखेडराजा : ‘जनहिताय जन सुखाय’चे घोषवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळाचे सर्व कर्मचारी विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या सणाला संपावर गेले. त्यामुळे १७ ऑक्टोबरच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही एसटी रस्त्यावर न धावल्यामुळे प्रवाशांचे ऐन दिवाळी सणामध्ये हाल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : ‘जनहिताय जन सुखाय’चे घोषवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळाचे सर्व कर्मचारी विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या सणाला संपावर गेले. त्यामुळे १७ ऑक्टोबरच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही एसटी रस्त्यावर न धावल्यामुळे प्रवाशांचे ऐन दिवाळी सणामध्ये हाल झाले.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना इतर कर्मचार्याप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा यासह त्यांच्या न्याय्य हक्कासाठी एस.टी. महामंडळाचे सर्व कर्मचारी १७ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर गेले. एस.टी.महामंडळाचे कर्मचारी सं पावर गेल्यामुळे सर्वात जास्त बंदचा फटका प्रवाशांना बसला आहे. ऐन दीपावलीच्या सणाला प्रवाशांना वेठीस धरुन संप पुकारल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासनानेसुद्धा कर्मचार्यांच्या न्याय्य हक्काचा सहानुभूतीने विचार करावा व तडजोड करुन संप मिटवावा, अन्यथा जनतेचा असं तोष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील बसस् थानकावरून एका दिवसात दोनशे ते अडीचशे बसफेर्या होतात. आज एकही बस रस्त्यावर फिरली नसून पाच बसेस पोलीस ठाण्यात उभ्या आहेत.
लोणारातही एसटी बंदमुळे प्रवासी त्रस्त
लोणार : येथे एसटी बस महामंडळाच्या कर्मचार्यांनी संप सुरु केल्याने ऐन दिवाळी सणाच्या सुरुवातीला बाहेरगावावरुन येणार्या व येथून बाहेरगावी जाणार्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अडचणीचे झाले. तसेच एसटी बससेवा संपामुळे बंद असल्याने प्रवाशांना लक्झरी, काळी-पिवळी यासारख्या खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. यामध्ये प्रवाशांचे आर्थिक व मानसिक हाल झाले. एकंदरीत एसटी बंदमुळे प्रवाशांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
मेहकर आगाराचे साडे नऊ लाखाचे नुकसान
मेहकर : एसटी महामंडळ कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संप सुरु केला आहे. या संपामुळे मेहकर आगाराचे १७ ऑक्टोबर रोजी जवळपास साडे नऊ लाख रु पयांचे नुकसान झाले असून, एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मेहकर आगारातून औरंगाबाद पंढर पूर, बीड. नागपूर, जळगाव खांदेशसह इतर मोठय़ा शहरांना तसेच ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावात एसटी बसेस धावतात. ग्रामीण तथा शहरी भागातून मेहकर येथे एसटीने दररोज हजारो प्रवाशी ये-जा करीत असतात. शाळेचे विद्यार्थी तथा विद्या र्थीनीसुद्धा एसटीनेच आपला प्रवास करतात; मात्र संपामुळे मेहकर आगाराच्या फेर्या या सकाळपासूनच बंद असल्याने सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी वाहनाने जादा भाडे खर्चुन प्रवास करावा लागला आहे. या संपामध्ये मेहकरचे कामगार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किसनराव बळी, इंटक युनियनचे घायाळ पाटील, इंटकचे विभागीय कार्याध्यक्ष सतीश पाटील, तेजनकर, डेपो अध्यक्ष मदन सोनुने, सचिव एस.पी.जाधव, एस.बी.शेख अबरार, व्ही.डी.तेलंग, सुनील राठोड, एस.टी.काळे, सी.के.मुळे, शकील खान, व्ही.पी.जाधव, पी.आर.राजगुरु, काळपांडे, एम.डी.चोपडे, आर.के.देशमुख, गो पाल राईतकर, जे.एस.खोकले आदी कर्मचार्यांनी संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
खासगी वाहनांचा आधार
देऊळगावराजा : आपल्या विविध मागण्यांसाठी एस.टी.कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे ऐन दिवाळीमध्ये ला खो प्रवाशांचे हाल झाले; मात्र देऊळगावराजा शहर परिसरात अनेकांनी काळी- पिवळीच्या साहय़ाने आपला प्रवास करुन आ पले घर गाठले. १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून अचानक एस.टी.कर्मचारी संपावर गेल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. देऊळगा वराजा शहर नागपूर-पुणे महामार्गावर असून, शिक्षणासाठी बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांना दिवाळी सुटीमध्ये आपल्या घरी येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. देऊळगावराजा येथे o्री बालाजी महाराजांच्या यात्रेची लगबग असून, असंख्य भक्तगण तसेच दिवाळीनिमित्त देऊळगावराजा शहरात येणार्या प्रवाशांची तारांबळ उडाली.