मतदार जागृतीसाठी इलेक्ट्रोरल लीटरसी क्लबची स्थापना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:04 AM2017-11-25T01:04:50+5:302017-11-25T01:07:29+5:30

बुलडाणा :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणार्या विशेष  मोहिमेतंर्गत १२ हजार ५८0 नव मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

Electoral Litterresy Club established for voter awareness! | मतदार जागृतीसाठी इलेक्ट्रोरल लीटरसी क्लबची स्थापना!

मतदार जागृतीसाठी इलेक्ट्रोरल लीटरसी क्लबची स्थापना!

Next
ठळक मुद्देविशेष मोहिमेत १२ हजार नव मतदारांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणार्या विशेष  मोहिमेतंर्गत १२ हजार ५८0 नव मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.  दरम्यान मतदानाविषयी मतदारांमध्ये जागृती व्हावी, यांसाठी इलेक्ट्रोरल लीटरसी  क्लबची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.  चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.शुक्रवारी जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उ पजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. 
     बीएलओ आपल्या दारी, इलेक्टोरल लीटरसी क्लब, चुनावी पाठशाळा,  व्होटर्स अवरनेस फोरम आदी उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. त्याच प्रमाणे १  जानेवारी २000 रोजी जन्म झालेल्या आणि १ जानेवारी २0१८ रोजी वयाची  १८ वर्षे पूर्ण करणार्या नव मतदारांचा सहस्त्रक मतदार म्हणून सन्मान  करण्यात येणार आहे. त्यामध्ये चार हजार मतदारांची ऑनलाईन तर ८,५८0  मतदारांची ऑफलाईन नोंदणी करण्यात आली. १0७0७ मतदारांनी नावे  वगळली तर १0८२ मतदारांनी नावात दुरुस्ती केली असल्याची माहिती  जिल्हाधिकारी यांनी दिली.  दरम्यान, बुथलेव्ह ऑफीस जुनी ओळखपत्रे  बदलून वीन ओळखपत्रे देणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडे नवीन छायाचित्र  देऊन स्मार्ट ओळखपत्र  देण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालयामध्ये  मुलांसाठी चुनावी पाठशाळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामधून नवम तदारांची नाव नोंदणी करण्यात येणार ओह. सोबतच शाळा महाविद्यालयामध्ये  इलेक्टोरल लीटरसी क्लब स्थापन करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी यांनी  सांगितले.  शासकीय, निमशासकीय, अशासकीय कार्यालय व खाजगी संस्था  यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यालय प्रमुखाने वोटर अवरनेस फोरमची स्था पना करावयाची आहे.  नव मतदारांसाठी  नाव नोंदणी संक्षीप्त पुनर्निरिक्षण  कार्यक्रमातंर्गत ३0 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.दरम्यान,   जे मतदार सहस्त्रक मतदार म्हणून नोंदणी करतील अशा मतदारांचा घरोघरी  जावून बीएलओ सत्कार करणार आहे.  २५ जानेवारी २0१८ ला तरूण म तदारांच्या समवेत त्यांना मी भारताचा सहस्त्रक मतदार आहे, असे लिहीलेले  खास बॅच व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी  सांगितले.

Web Title: Electoral Litterresy Club established for voter awareness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.