शुक्रवारपासून खामगावात भव्य कृषी महोत्सव; शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:57 AM2018-02-16T01:57:51+5:302018-02-16T01:59:52+5:30

खामगाव : पश्‍चिम विदर्भात पहिल्यांदाच भव्य स्वरुपात खामगावात १६ ते २0 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खामगावात येत आहेत. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे. 

Great Agricultural Festival in Khamgaon from Friday; Inauguration of the Chief Minister on Saturday | शुक्रवारपासून खामगावात भव्य कृषी महोत्सव; शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शुक्रवारपासून खामगावात भव्य कृषी महोत्सव; शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next
ठळक मुद्दे शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे कृषी मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांचे आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पश्‍चिम विदर्भात पहिल्यांदाच भव्य स्वरुपात खामगावात १६ ते २0 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खामगावात येत आहेत. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे. 
 ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रयत्नातून बुलडाण्यासह पश्‍चिम विदर्भातील  जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या हितासाठी व मार्गदर्शनासाठी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ही सुवर्ण संधी चालून आली आहे.  शुक्रवार, १६ फेब्रुवारी  ते २0 फेब्रुवारीपयर्ंत जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक कॉलेजच्या भव्य मैदानावर सकाळी १0.00 ते सायंकाळी ६.00 वाजेपयर्ंत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवाच्या प्रारंभ व प्रचार, प्रसारासाठी शुक्रवारी सकाळी ११.00 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदान येथून भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी दिंडी निघणार आहे. खामगाव मतदार संघाचे युवा आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात  निघणार्‍या या दिंडीला राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर हिरवी झेंडी दाखवणार असून, नंतर ही दिंडी खामगाव शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करून तिचा समारोप कृषी महोत्सव स्थळी  होईल. या रॅलीमध्ये खामगाव मतदार संघातील शेतकरी बांधव मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत.

मुख्यमंत्री उद्या खामगावात
या महोत्सवाच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी १0.00 वा येत आहेत.  यावेळी राज्याचे कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांचेसह भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.डॉ संजय कुटे, अँड. आकाश फुंडकर यांचेसह आमदार, खासदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

कृषी महोत्सवाचे आकर्षण 
या कृषी महोत्सवात ४00 हून अधिक स्टॉल आहेत. यामध्ये शेती विषयी  माहिती, तंत्रज्ञान, बिबियाणे, सेंद्रीय शेती, सौर शेती कुंपण, शेती उत्पादने, शेती प्रक्रीया उद्योग, पशुपालन, यासह अत्याधुनिक शेतीची प्रात्यक्षिके दाखविणारे स्टॉल राहणार आहेत.  शासनाच्या योजनांची माहिती याठिकाणी देण्यात येणार आहे. या कृषि महोत्सवास शेतकरी बांधवानी मोठया प्रमाणात भेट देऊन आपल्या शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे दृष्टीने नवीन तंत्रज्ञान व शेती पुरक व्यवसाय करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी व फलोत्पादन मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे. 

Web Title: Great Agricultural Festival in Khamgaon from Friday; Inauguration of the Chief Minister on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.