सामान्य तक्रारींचा तात्काळ निपटारा करावा - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 08:30 PM2017-09-05T20:30:08+5:302017-09-05T20:30:29+5:30
लोकशाही दिनाची कार्यवाही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला होत असते. यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतात. लोकशाही दिन कार्यवाहीच्या कक्षेत न येणा-या तक्रारींना सामान्य तक्रारी म्हणून संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित विभागाकडून अशा तक्रारींवर त्वरित निपटारा करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लोकशाही दिनाची कार्यवाही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला होत असते. यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतात. लोकशाही दिन कार्यवाहीच्या कक्षेत न येणा-या तक्रारींना सामान्य तक्रारी म्हणून संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित विभागाकडून अशा तक्रारींवर त्वरित निपटारा करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार शैलेश काळे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या लोकशाही दिनामध्ये एकूण २० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी लोकशाही दिन कार्यवाहीसाठी ८ तक्रार स्वीकृत करण्यात आली. तसेच १२ तक्रारी सामान्य तक्रार म्हणून अन्य विभागांकडे पाठविण्यात आल्या. तसेच तीन तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तहसीलदार शेगांव, महावितरण व कार्यकारी अभियंता सार्व. बांधकाम विभाग खामगांव यांच्याकडील तक्रारींचा समावेश आहे. लोकशाही दिन कार्यवाहीला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.