सिंदखेड राजा विकास आराखड्याचा निधी तत्काळ द्या; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:43 PM2017-11-08T13:43:35+5:302017-11-08T13:45:35+5:30

सिंदखेड राजा : मातृतीर्थ जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असलेल्या  सिंदखेड राजा शहराच्या विकास आराखड्यासाठी तत्काळ निधी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.

Instant fgive funds for Sindhkhed Raja development plan; NCP Student Congress Demands | सिंदखेड राजा विकास आराखड्याचा निधी तत्काळ द्या; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

सिंदखेड राजा विकास आराखड्याचा निधी तत्काळ द्या; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

Next
ठळक मुद्देराज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार प्रतापराव जाधव यांना निवेदन


सिंदखेड राजा : मातृतीर्थ जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असलेल्या  सिंदखेड राजा शहराच्या विकास आराखड्यासाठी तत्काळ निधी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.
सोमवारी महसूल राज्यमंत्री एका कार्यक्रमानिमित्त सिंदखेड राजात आले होते. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. सिंदखेड राजा शहर व परिसर विकासाच्या प्रवाहापासून दूर आहे.. आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी २५० कोटी रुपायंचा विकास आराखडा यासाठी मंजूर केला होता. पुढे सध्याच्या शासनाच्या काळात त्यात वाढ करून तो ३११ कोटी रुपायंचा करण्यात येतून निधी तत्काळ देण्याची घोषणा केली होती.  आजपर्यंत मात्र आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध झालेला नाही. सध्याचे सत्ताधारी या प्रश्नी दिशाभूल करती असल्याची शंका येत असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने म्हंटले आहे.
प्रकरणी महसूल राज्यमंत्री आणि खासदारांनी याप्रश्नी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप मेहेत्रे, शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे, तालुकाध्यक्ष दीपक येखंडे, नितीन चौधरी, संदीप देशमुख, शेख यासीन, राजे जाधव, वाजेद पठाण,  तुषार मेहेत्रे, शेख वाशीम, विशाल लिहिणार यांच्यासह अन्य सहकार्यांच्या यावर स्वाक्षर्या आहेत.

Web Title: Instant fgive funds for Sindhkhed Raja development plan; NCP Student Congress Demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.