खामगाव : पळशीजवळ भरधाव ट्रकची मालवाहूला ऑटोला धडक; २ ठार, ६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:17 PM2018-01-04T22:17:54+5:302018-01-04T23:09:53+5:30

पळशी बु. (खामगाव): भरधाव ट्रकने मालवाहू ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात  २ व्यक्ती ठार त ५ गंभिर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता खामगाव  तालुक्यातील पळशी बु. येथे घडली. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना अकोला येथील सर्वाेपचार रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

Khamgaon: Cargo carrying cargo stuck at Palshi; 2 killed, 6 injured | खामगाव : पळशीजवळ भरधाव ट्रकची मालवाहूला ऑटोला धडक; २ ठार, ६ जखमी

खामगाव : पळशीजवळ भरधाव ट्रकची मालवाहूला ऑटोला धडक; २ ठार, ६ जखमी

Next
ठळक मुद्दे ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता पळशी बु. येथे घडलीमृतांची नावे : सविता अंबादास कळस्कार व त्र्यंबक वामन चिंचोळकर जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पळशी बु. (खामगाव): भरधाव ट्रकने मालवाहू ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात  २ व्यक्ती ठार त ५ गंभिर जखमी झाले. ही घटना गुरुवार ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे घडली. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना अकोला येथील सर्वाेपचार रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 
बाळापूरकडे जाणार्‍या पळशी बु. येथील एम.एच.२८-आर-१५६0 क्रमांकांच्या  मालवाहू ऑटोला, विरुद्ध दिशेने भरधाव येणार्‍या एम.एच. सी. ५४५0  क्रमांकांच्या ट्रकने जोरदार धडक दिली. विरुद्ध दिशेने येणारा ट्रक बाळापूरवरुन लाखनवाड्याकडे जात होता. अपघातात मालवाहू आॅटोने प्रवास करणारे सविता अंबादास कळस्कार (वय ४५) रा. हिंगणा-उमरा व त्र्यंबक वामन चिंचोळकर (वय  ६७) रा. वाडेगाव हे दोघे ठार झाले. तर कौशल त्र्यंबक चिंचोळकर (वय ६0),  भास्कर धुरंदर (वय ५५) दोघेही रा. फत्तेपूर, विजयमाला भास्कर धुरंधर (वय ५0),  ज्योतीराम जयराम बुजाडे दोघेही रा, बोरगाव मंजू व त्यांच्यासोबत मालवाहू ऑटोमध्ये  प्रवास करित असलेले आणखी दोघे जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्या  सहाही जणांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार  रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. जखमींना ताबडतोब उपचार मिळावेत  यासाठी अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी मोलाचे सहकार्य केले. 

Web Title: Khamgaon: Cargo carrying cargo stuck at Palshi; 2 killed, 6 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.