खामगाव : आकाश फुंडकर यांनी केली गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 07:30 PM2018-02-11T19:30:50+5:302018-02-11T19:31:30+5:30
खामगाव : गारपीटीचा तडाखा खामगांव मतदार संघातील अनेक गावांना बसला. यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी रविवारी दुपारी केली. नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्य सरकारने काही दिवसापुर्वी विदर्भात गारपिट होण्याबाबत हवामानाचा अंदाज वर्तविला होता. सकाळी खामगांव मतदार संघातील खामगांव व शेगांव तालुक्यातील काही भागात मोठया प्रमाणात गारपिट झाली. त्यामुळे गहु, हरभरा इत्यादी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ही माहिती समजताच आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी मतदार संघातील रोहणा, कोन्टी, वर्णा, नांद्री, काळेगांव, ढोरपगांव,कवडगांव, बेलखेड, आदी गावांचा तातडीने दौरा करुन गारपिट ग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, तहसिलदार सुनील पाटील, जि. प. सभापती डॉ गोपाल गव्हाळे, तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, उपसभापती भगवानसिंह सोळंके, शत्रुघ्न पाटील, लाला महाले, समाधान मुंढे, तालुका सरचिटणीस शांताराम बोधे, हरसिंग साबळे व कृषी विभागाचे अधिकारी व कृषी सहाय्यक उपरोक्त गांवाचे तलाठी देखील उपस्थित होते. यावेळी शेतकºयांना धीर दिला.