कापड दुकान फोडून एक लाखाची रोख लंपास
By admin | Published: April 20, 2015 10:38 PM2015-04-20T22:38:01+5:302015-04-20T22:38:01+5:30
खामगाव येथे ठोक कापड दुकानातून एक लाखाची रोख लंपास.
खामगाव : शहरातील बालाजी प्लॉट भागातील ठोक कापड दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून एक लाखाची रोख लंपास केली. ही घटना १९ एप्रिल रोजी रात्रीचे सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बालाजी प्लॉट भागातील रहिवासी गणेश घवाळकर यांचे याच भागात ठोक रेडिमेड कापड विक्रीचे दुकान आहे. दरम्यान १९ एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी या दुकानाच्या मागील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील लोखंडी पेटी फोडून त्यामधील १ लाख २ हजाराची रोख र क्कम लंपास केली. २0 एप्रिल रोजी सकाळी घवाळकर हे दुकान उघडण्यास गेले असता, ही घटना त्यांच्या लक्षात आली. याप्रकरणी गणेश घवाळकर यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४६१, ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.