युवकांनी केले निर्माल्याचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:10 AM2017-09-07T00:10:52+5:302017-09-07T00:11:02+5:30

जळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले.

Management of Creatives by Youths | युवकांनी केले निर्माल्याचे व्यवस्थापन

युवकांनी केले निर्माल्याचे व्यवस्थापन

Next
ठळक मुद्देपर्यावरण ग्रुपचा स्तुत्य उपक्रमगोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या गणरायांचे  निर्माल्य गोळा केले 

जयदेव वानखडे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले. तालुक्यात ५ सप्टेंबर रोजी जामोद वगळता  गणरायांचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये मोठ- मोठे गणपती विसर्जनाकरीता पूर्णा नदीवर तथा  गोराडा धरणावर आणले होते. यावर्षी मोठय़ा प्रमाणात  पाणीटंचाई असल्याने आधीच धरणामध्ये केवळ २0  टक्के एवढाच जलसाठा आहे. त्यात विसर्जनाचे वेळी  हार-फुले, दहा दिवसांच्या दुर्वा व इतर पुजेचे साहित्य  या निर्माल्यासह धरणात विसर्जन करण्याची सर्वांची  दरवर्षीची परंपरा. परंतु गेल्या ४/५ वर्षापासून  पर्यावरण मित्र याठिकाणी हजर राहून सर्व निर्माल्य  गोळा करतात व त्याची योग्य विल्हेवाट लावतात.  त्यानुसार मंगळवारी दुपारपासून धरणावर एकत्र येवून  विसर्जनासाठी येणार्‍या गणरायांचे निर्माल्य पर्यावरण  मित्रांनी गोळा केले.
यामुळे धरणातील पाण्याचे प्रदूषण टाळल्या गेले. तर  केवळ गणपतीच्या मूर्त्यांनाच पाण्यात नेवून विसर्जीत  करण्यात आले. आदिवासींच्या घराघरात आणि प्र त्येक गावात गणरायांची स्थापना झालेली असल्याने  जळगाव शहर, सुनगाव, गोराडा, निमखेडी, चारबन,  डुक्करदरी इत्यादी गावांमधून वाजत गाजत धरणावर  आणून जवळपास एक हजार गणेश मूर्तींचे या धरणात  विसर्जन करण्यात आले.  या धरणामधून जळगाव  शहराला पाणी पुरवठा होत असतो आणि हार-फुले,  दुर्वा इत्यादी पुजेचे साहित्य धरणात प्रवाहीत केल्याने  ते कुजते व सडते. परिणामी लाखो लिटर पाणी प्रदूषित  होते. त्याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर हो तो. एवढेच नव्हे तर या परिसरातील आदिवासींच्या  आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून पर्यावरण  मित्रांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला सर्वांनी  भरभरून प्रतिसाद दिला. सर्वांनी धरणाकाठी पूजा  करून निर्माल्य पर्यावरण प्रेमींच्या स्वाधीन केले.  या तील प्लॅस्टीक पिशव्यांची होळी करून उर्वरीत  निर्माल्य पर्यावरण मित्रांनी एक शेतात विसर्जीत केले.  यासाठी सर्पमित्र शरद जाधव, इंजिनिअर सुनिल भग त, विकी मिश्रा, बाळु मानकर, चतुभरुज केला यांचेसह  अनेक पर्यावरण मित्रांनी परिश्रम घेतले.  

Web Title: Management of Creatives by Youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.