पाणीपूरवठा योजनांसंबंधी मंत्र्यांना चुकीची माहीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:15 AM2017-10-04T01:15:16+5:302017-10-04T01:15:32+5:30
बुलडाणा : अमरावती येथे पाणीपूरवठा मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत पाणीपूरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांबाबत दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अमरावती येथे पाणीपूरवठा मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत पाणीपूरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांबाबत दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे.
अमरावती येथे पाणीपुरवठा विभागाची बैठक झाली. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना अधिकार्यांकडून बुलडाणा जिल्ह्यात फक्त २२ नळ पाणी पुरवठा योजनामध्ये गैरव्यवहार आहे, तर सात योजनांची चौकशी होऊन कार्यवाही सुरु असल्याची माहीती देण्यात आली. या पृष्ठभूमिवर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पत्रक काढून ना. लोणीकर यांना आव्हान दिले आहे. सावजी यांनी पत्रकात म्हटले आहे की, बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्यावतीने जिल्हय़ातील नळयोजनांच्या कामामध्ये संबंधीत यंत्रणशी संबंधीत लोकांकडून कमीत कमी दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे कार्यकारी अभियंते, विभागीय अधिकारी, राज्यस्तरीय अधिकारी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे दिलेले आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त, त त्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, विभागीय आयुक्त, विद्यमान जिल्हाधिकारी विद्यमान कार्यपालन अधिकारी, अमरावती विभागीय अधिकारी श्यामलाल गोयल, अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलीक मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा करुन या विषयावर समितीने बाजू मांडली.९0 टक्के नळयोजनांमधून दररोज शुध्द पाणी पिण्यास मिळत नाही. अनेक योजनांची कामे गेल्या पाच ते पंधर वर्षापासून बंद आहेत. उ पलब्ध निधीत योजना पूर्ण होत नाही या सबबीवर वाढीव निधी मागितला जातो. झालेल्या निधीच्या खर्चाची अर्थात भ्रष्टाचाराची कोणतीही चौकशी न होता टक्केवारीने वाढीव निधी मंजूर होतो, असेही माजी मंत्री सावजी यांनी पत्रकात म्हटले आहे. २६ जानेवारी २0१८ पर्यंत जिल्हय़ातील भ्रष्टाचारावर कारवाई न झाल्यास भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार्यांचा खून करेल, असा इशाराही सावजी यांनी संबंधीत विभागाला दिला आहे.