अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 08:08 PM2017-08-17T20:08:48+5:302017-08-17T20:10:03+5:30
मानोरा - तालुक्यातील सोमेश्वरनगरातील एका अल्पवयीन मुलगी तिज उत्सव कार्यक्रमाला गेली असता, आरोपीने तिचा विनयभंग केल्याची तक्रार १६ आॅगस्टला रात्री दरम्यान देण्यात आली. यावरून १७ आॅगस्टला मानोरा पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

तिज उत्सव कार्यक्रम आटोपून घरी परत जाताना आरोपी विष्णू अमरसिंग पवार याने १६ आॅगस्टच्या रात्रीदरम्यान सदर मुलीचा विनयभंग केला. पिडीत मुलीच्या वडिलाने दिलेल्या तक्रारीहून आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३५४, ५०६, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ७, ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल काटकाडे, मदन पुणेवार करीत आहेत.