शेगाव येथे ‘श्रीं’च्या प्रकट दिनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:21 AM2018-02-03T00:21:50+5:302018-02-03T00:22:09+5:30

शेगाव : श्री संत गजानन महाराजांच्या १४0 वा प्रगटदिनोत्सवास संतनगरीमध्ये माघ वद्य १ गुरूवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. श्रींचे मंदीरात प्रगटदिनोत्सवानिमित्त सकाळी १0 वा. ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात व श्री गजानन महाराज संस्थानच्या शिवभक्ताच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महारूद्रस्वाहाकारास योगास आरंभ करण्यात आला. विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांचे हस्ते यावेळी पूजन झाले. 

The opening day of 'Shree' in Shegaon | शेगाव येथे ‘श्रीं’च्या प्रकट दिनास प्रारंभ

शेगाव येथे ‘श्रीं’च्या प्रकट दिनास प्रारंभ

Next
ठळक मुद्दे१ ते ७ फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : श्री संत गजानन महाराजांच्या १४0 वा प्रगटदिनोत्सवास संतनगरीमध्ये माघ वद्य १ गुरूवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. श्रींचे मंदीरात प्रगटदिनोत्सवानिमित्त सकाळी १0 वा. ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात व श्री गजानन महाराज संस्थानच्या शिवभक्ताच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महारूद्रस्वाहाकारास योगास आरंभ करण्यात आला. विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांचे हस्ते यावेळी पूजन झाले. 
प्रगटदिनोत्सवानिमित्त १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मंदीरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ५ ते ६ काकडा, ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ५.३0 हरीपाठ, रात्री ८ ते १0 किर्तन होत आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून दररोज भजनी दिंड्यांचे आगमन संतनगरीत चालु आहे. श्रींच्या मंदीरात ठिकठिकाणी केळीचे खांब लावण्यात आले आहे. भाविकांची मंदीर परिसरात गर्दी होईल हे लक्षात घेता वन-वे (एकेरी मार्ग) करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था संस्थानच्यावतीने करण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी श्रींच्या १४0 वा प्रगटदिनी सकाळी १0 ते १२ हजर श्रीरामबुवा ठाकुर यांचे शेगावी ‘श्रींच्या प्रागट्या’ निमित्य किर्तन होईल. तद्नंतर सकाळी १0 वा. यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान होईल. दुपारी २ वा. श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्‍वासह नगर परिक्रमा निघेल. ८ फेब्रुवारी मिती माघ वद्य ८ गुरूवारला हभप प्रमोदबुवा राहणे मु. पळशी यांचे सकाळी ७ ते ८ काल्याचे किर्तन होईल. 

Web Title: The opening day of 'Shree' in Shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.