नियुक्त एजन्सीलाच देणार जैविक कचरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:00 AM2017-09-16T00:00:19+5:302017-09-16T00:01:25+5:30

बुलडाणा: शहर परिसरातील अनेक हॉस्पिटलमधील  प्रशासन जैविक कचारा भंगारात किंवा नाल्यात टाकत  असल्याचे वृत्त लोकमतने १४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले हो ते. या वृत्ताची दखल घेत अनेक हॉस्पिटलच्या प्रशासनाने  शहरातील जैविक कचरा उचलणार्‍या एजन्सीशी संपर्क  साधून नियमित वर्गवारीनुसार कचरा देणार असल्याचे सांगि तले.

Organic garbage will be given to the designated agency | नियुक्त एजन्सीलाच देणार जैविक कचरा!

नियुक्त एजन्सीलाच देणार जैविक कचरा!

Next
ठळक मुद्देअनेक रुग्णालयांनी केला संपर्कप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहर परिसरातील अनेक हॉस्पिटलमधील  प्रशासन जैविक कचारा भंगारात किंवा नाल्यात टाकत  असल्याचे वृत्त लोकमतने १४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले हो ते. या वृत्ताची दखल घेत अनेक हॉस्पिटलच्या प्रशासनाने  शहरातील जैविक कचरा उचलणार्‍या एजन्सीशी संपर्क  साधून नियमित वर्गवारीनुसार कचरा देणार असल्याचे सांगि तले.
बुलडाणा शहरातील अनेक लहान क्लिनिकपासून मोठय़ा  हॉस्पिटल परिसरात वापरलेल्या सिरींज, नळ्या, बँडेज  आदींचा खच पडलेला असतो. शहरात जवळपास २५0  हॉस्पिटल,  क्लिनिक व लॅबोरेटरीज संस्था कार्यरत आहेत.  या संस्थेद्वारे दररोज २00 किलो जैविक कचर्‍याची निर्मिती  होते. सदर जैविक कचरा उचलण्यासाठी शहर परिसरात  एकमेव अतुल एन्व्हायरर्मेंट सर्व्हिसेस म्हणून एजन्सी कार्यरत  आहे. या एजन्सीकडे शहरातील फक्त ८0 म्हणजे ३२ टक्के  संस्थांची नोंदणी केली आहे. त्यामुळे उर्वरित ६८ टक्के संस् थांचा जैविक कचरा कोठे जातो? असा प्रश्न निर्माण होतो.  याबाबत लोकमच्या टीमने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान  उर्वरित हॉस्पिटलचा कचरा भंगार व नाल्यात टाकण्यात येत  असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत लोकमतमध्ये वृत्त  प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, अनेक  हॉस्पिटलने अतुल एन्व्हायरर्मेंट सर्व्हिसेसकडे संपर्क करून  आपल्याकडे नियमित जैविक कचरा देणार असल्यामुळे  आमच्या हॉस्पिटलची नोंद करण्याची विनंती केली. यावेळी  अनेक हॉस्पिटल प्रशासनाने नाव न सांगण्याचा अटीवर  आजपासून जैविक कचर्‍यांची वर्गवारी करून संबंधित  एजन्सीकडे देणार असल्याचे सांगितले.

Web Title: Organic garbage will be given to the designated agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.