पोटेंशियल सिटीमध्ये जिल्ह्यातील चार शहरांचा समावेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:58 AM2017-11-21T00:58:35+5:302017-11-21T01:03:24+5:30
जळगाव जामोद : केंद्र शासनाने देशातील चार हजार शहरांची निवड ही स्वच्छ भारत अभियानासाठी पोटेंशियल सिटी म्हणून केली आहे. यात बुलडाणा जिल्ह्या तील जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा व लोणार या चार शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : केंद्र शासनाने देशातील चार हजार शहरांची निवड ही स्वच्छ भारत अभियानासाठी पोटेंशियल सिटी म्हणून केली आहे. यात बुलडाणा जिल्ह्या तील जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा व लोणार या चार शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्र शासनाची टिम ५ जानेवारी २0१८ पासून या शहरांची पाहणी करणार असल्याची माहिती आ. डॉ. संजय कुटे यांनी दिली. या स्वच्छ भारत अभियान स् पर्धेत जनतेच्या सहकार्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
केंद्र शासनाच्यावतीने १८ जानेवारी २0१८ पासून स्वच्छ भारत अभियान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पोटेंशियल सिटीमध्ये निवड झालेली शहरे हगणदरीमुक्त असली पाहिजे, ओला व सुक्या कचर्याचे वर्गीकरण करण्यात आले पाहिजे, शहर स्वच्छ असले पाहिजे, सॅनिटेशनची व्यवस्था झालेली असली पाहिजे, तसेच सुंदर रस्ते व बागबगीचे यांची उभारणी संबंधित शहरात असली पाहिजे, असे काही निकष लावण्यात आले आहेत. या निकषाला अनुसरून पोटेंशियल चार हजार शहरांपैकी देशातून २५ शहरांची ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’म्हणून निवड करण्यात येऊन त्या शहरांना केंद्र शासनाचा प्रत्येकी ५ कोटीचा निधी देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील या चारही शहरांनी नियोजनास प्रारंभ केला आहे. पाच जानेवारी केंद्राची टीम या शहरांची पाहणी करणार असल्याचे आ. कुटे यांनी सांगितले. या शहरांना आता स्वच्छतेसंदर्भात मोठे काम करावे लागणार आहे.
जनचळवळीसाठी गुरूवारी बैठक
स्वच्छ भारत अभियान ही जनचळवळ यासाठी सर्व स्वयंसेवी व सेवाभावी संस्था, शिक्षण-प्राध्यापक, व्यापारी वर्ग, पत्रकार संघटना, शैक्षणिक संस्था यांची बैठक गुरूवार, २३ रोजी सकाळी ११ वा. जळगाव जामोद येथे तर दुपारी ३ वा. शेगाव ये थे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ.डॉ.संजय कुटे यांनी दिली. जळगाव जामोद मतदार संघात दोन नगरपालिका असून, या दोन्ही नगरांचा पोटॅशिअल सिटीमध्ये समावेश झाला आहे. आता ही शहरे पहिल्या २५ शहरांमध्ये यावी, यासाठी सर्व नागरिकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही आ.संजय कुटे यांनी सांगितले.