तुर खरेदी केंद्रावर योग्य नियोजन करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2017 01:54 PM2017-05-21T13:54:30+5:302017-05-21T13:54:30+5:30
तूर खरेदी केंद्रांवर योग्य नियोजन करण्याचेनिर्देश जिल्हाधिकाºयांनी दिेल आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश बुलडाणा: काही बाजार समित्यांकडुन योग्यरीत्या नियोजन नसल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परीणामी शेतकऱ्यांची गैरसोय झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तूर खरेदी केंद्रांवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिेल आहे. नाफेड अंतर्गत तूर खरेदी २२ एप्रीलनंतर देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व मोताळा या तालुक्यात तुर खरेदी बंद करण्यात आली आहे. पंचनाम्यानुसार तुरीचे मोजमाप सुरू आहे. शेगाव, बुलडाणा, खामगांव व लोणार या केंद्रावरील तुर खरेदी दोन दिवसात तसेच उर्वरीत तुर खरेदी चार दिवसात संपणार आहे. तसेच तुर खरेदीसाठी केंद्र शासनाने नाफेडची नोडल एजन्सी म्हणुन नियुक्ती केली आहे. ज्या केंद्रावर २२ एप्रीलनंतर पंचनाम्यानुसार तुर बाकी असेल ती तुर प्रथम प्राधान्याने खरेदी करावयाची आहे. कृषि विभागाच्या किंमत समर्थन योजनेखाली तुर खरेदी करताना बाजार समिती शेतकऱ्यांकडून तुर व्रिकी संबंधी शेतीचा सात बारा, पेरेपत्रक, आधारकार्ड किंवा ओळखपत्र इ.माहिती गोळा करुन शेतकऱ्यांचे वाहन असल्यास वाहनावर क्रमांक टाकणे, तुरीची खरेदी रजीस्टरमध्ये नोंद घेणे, शेतकऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करुन घेऊन क्रमाने तुर मोजमापासाठी शेतकऱ्यांना बोलावुन घेऊन खरेदी केंद्रावर एका दिवशी जेवढी तुर मोजल्या जाईल तेवढीच तुर बाजार समितीचे यार्डवर घेणे,याबाबत सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांना कळविण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.