शिशू विभाग ठरतोय नवजात बालकांना संजीवनी
By admin | Published: September 11, 2014 12:22 AM2014-09-11T00:22:08+5:302014-09-11T00:22:08+5:30
खामगाव सामान्य रूग्णालयात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी हायटेक सुविधा.
खामगाव : नवजात, कमी वजनाची अथवा गंभीर आजार असलेले बाळ जन्माला आल्यास त्याची योग्य काळजी घेण्यासाठी तसेच नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी खामगाव सामान्य रूग्णालयात अत्याधुनिक नवजात शिशु अ ितदक्षता विभाग (एसएनसीयु) कार्यान्वित झाला आहे. गेल्या वर्षभरात ३ हजार ५00 बालकांना याचा लाभ झाला असून शिशु विभाग नवजात बालकांसाठी संजीवनी ठरला आहे.
कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यास त्याच्या जीवाला धोका संभवू शकतो. निरोगी माता- निरोगी बाळ हे शासनाचे ध्येय असून गरोदरपणापासून तर प्रसुतीपर्यंत मातेच्या व बाळाच्या योग्य पोषणासाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात.
खामगाव येथील सामान्य रूग्णालयात नवजात शिशु अ ितदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. खाजगी रूग्णालया तील अशा प्रकारच्या विभागाला लाजवेल अशी अत्याधुनिक हायटेक सुविधा नवजात बालकांना शासनाकडून मोफत मिळत आहे. शिशु विभागात १२ स्वतंत्र बेडची व्यवस्था असून २५ बालक येथे ठेवता येवू शकतात. भरती करण्यात आलेल्या बाळाच्या आईला राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.