शेगाव ते पुणे दरम्यान धावणार वातानुकूलीत ‘शिवशाही’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:55 AM2017-12-05T00:55:21+5:302017-12-05T00:59:18+5:30

शेगांव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शेगाव ते पुणे अशी संपूर्ण वातानुकूलीत  ‘शिवशाही’ बसचा शुभारंभ ४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष शकुंतला बुच यांच्या हस्ते ७.३0 वाजता  शुभारंभ झाला. 

'Shivshahi' will be held in Delhi from Shegaon to Pune. | शेगाव ते पुणे दरम्यान धावणार वातानुकूलीत ‘शिवशाही’!

शेगाव ते पुणे दरम्यान धावणार वातानुकूलीत ‘शिवशाही’!

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी नगराध्यक्षांच्या हस्ते झाला ‘शिवशाही’ बसचा शुभारंभशेगाव ते पुणेसाठी आकारले जाणार ७६0 रुपये प्रवास भाडे 

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगांव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शेगाव ते पुणे अशी संपूर्ण वातानुकूलीत  ‘शिवशाही’ बसचा शुभारंभ ४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष शकुंतला बुच यांच्या हस्ते ७.३0 वाजता  शुभारंभ झाला. 
बस शेगाव बसस्थानकावरून दररोज रात्री ९ वाजता निघणार असून, खामगाव, चिखली,  औरंगाबाद या तीन स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. दुसर्‍या दिवशी  सकाळी ६.३0 वाजता  दरम्यान पुणे येथे पोहोचणार आहे.  बसचे शेगाव ते पुणेसाठी ७६0 रुपये भाडे आकारण्यात आले  असून, बसची ४३ सिटची आसन व्यवस्था आहे.
‘शिवशाही’च्या उद्घाटन प्रसंगी एस.टी. महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी (डी.टी.ओ.)  कछवे, आगार प्रमुख स्वप्निल मास्कर, आगार नियंत्रक, शंकरराव देशमुख, भाजपा शहर  अध्यक्ष डॉ. मोहन बानोले, विजय भलतिडक,  भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख,  नगरसेवक, गजानन जवंजाळ, माधव लिप्ते आदींची उपस्थिती होती.  

Web Title: 'Shivshahi' will be held in Delhi from Shegaon to Pune.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.