सिंदखेडराजा @ ९५.६३ टक्के; तालुका ठरला जिल्ह्यात अव्वल
By admin | Published: June 14, 2017 12:52 AM2017-06-14T00:52:01+5:302017-06-14T00:52:01+5:30
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातून एकूण २४७५ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी २३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा सरासरी निकाल ९५.६३ टक्के देत, जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातून एकूण २४७५ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी २३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा सरासरी निकाल ९५.६३ टक्के देत, जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. ९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
त्यामध्ये महात्मा जोतिबा फुले हायस्कूल सिंदखेडराजा, जीवन विकास विद्यालय साठेगाव, राष्ट्रमाता जिजाऊ कन्या विद्यालय सिंदखेडराजा, सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे विद्यालय चांगेफळ, कै.भास्करराव शिंगणे विद्यालय गुंज, व्ही.एम. उर्दू माध्यमिक विद्यालय मलकापूर पांग्रा, सहकार विद्या मंदिर सिंदखेडराजा, आदर्श माध्यमिक विद्यालय सिंदखेडराजा, सहकार विद्या मंदिर साखरखेर्डा या ९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे, तर कै.भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालय खैरव या शाळेचा सर्वात कमी ७८.५७ टक्के निकाल लागला आहे, तसेच शाळानिहाय निकालामध्ये
नूतन माध्यमिक विद्यालय किनगाव राजा ९९.०३, एसईएस हायस्कूल साखरखेर्डा ९७.४१, जिजामाता विद्यालय सिंदखेडराजा ९८.६२, नेहरु विद्यालय मलकापूर पांग्रा ९९.११, श्री.शिवाजी हायस्कूल साखरखेर्डा ९९.०१, शिवाजी हायस्कूल जांभोरा ९७.४३, जनता विद्यालय सावखेड तेजन ९८.७५, वसंतराव नाईक विद्यालय शेंदुर्जन ९७.७०, यशवंत विद्यालय दिग्रस बु.९०.३२, स्वामी विवेकानंद विद्यालय सोनोशी ९६.१५, जीवन विकास विद्यालय दुुसरबीड ९५.३६, संजय गांधी विद्यालय धांदरवाडी ८१.१८, जिजामाता विद्यालय साखरखेर्डा ९८.७७, जिजामाता विद्यालय आडगावराजा ९१.८९, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय सिंदखेडराजा ९५.२३, तुकाराम कायंदे विद्यालय रुम्हणा ९२.६८, ज्ञानेश्वर विद्यालय दुसरबीड ९८.२७, यशवंतराव चव्हाण हायस्कूल राजेगाव ९३.१०, अण्णासाहेब गायकवाड विद्यालय देऊळगाव कोळ ७६.१९, उर्दू हायस्कूल साखरखेर्डा ८७.३०, कामाक्षीदेवी माध्यमिक विद्यालय किनगावराजा ९४.५९, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उर्दू हायस्कूल सिंदखेडराजा ९२.५९, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय शेंदुर्जन ९५.९१, प्रो.जावेदखान उर्दू हायस्कूल दुसरबीड ९७.५०, कै.भास्करराव शिंगणे विद्यालय दरेगाव ९५.४५, स्व.विजय मखमले विद्यालय हिवरखेड पूर्णा ९३.५४, श्री काकासाहेब भास्करराव शिंगणे हायस्कूल अंचली ९०.३२, संत दुनियादास महाराज माध्यमिक विद्यालय राहेरी बु.८५.७१, सावित्रीबाई फुले विद्यालय शिवणीटाका ९३.९३, वैभव माध्यमिक विद्यालय वर्दडी ९६.३८, स्व.विजय मखमले हायस्कूल मलकापूर पांग्रा ९२.१५ टक्के याप्रमाणे लागला आहे. तर तालुक्यातील ८४८ विद्यार्थी प्रविण्य श्रेणीत, १०९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३९९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २९ विद्यार्थी केवळ पास झाले.