मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, स्वातंत्र्य दिनीच संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 06:14 PM2018-08-15T18:14:04+5:302018-08-15T18:15:00+5:30
लोणार : तालुक्यातील जाफ्राबाद शेत शिवारात असणाऱ्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून 45 वर्षीय खुशालराव भाऊराव ओव्हर इसमाने आत्महत्या केली आहे. ऐन 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनीच खुशालराव यांनी आत्महत्या
लोणार : तालुक्यातील जाफ्राबाद शेत शिवारात असणाऱ्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून 45 वर्षीय खुशालराव भाऊराव ओव्हर इसमाने आत्महत्या केली आहे. ऐन 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनीच खुशालराव यांनी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. जाफ्राबाद – बागुलखेड रस्त्यावर असलेल्या चिंचच्या झाडाला दोरीने गळफास घेतला.
खुशालराव यांनी गळफास घेतल्याची चर्चा 15 ऑगस्ट रोजी सकाळी होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी खुशालरावांनी झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांच्या खिशात आय सपोर्ट टू मराठा क्रांती मोर्चा अशा आशयाची चिठ्ठी आढळून आली आहे. लोणार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. मराठा आरक्षणासाठी एका मागोमाग आत्महत्या होत असून सरकारला कधी जाग येणार अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही.
खुशालराव ओव्हर हे अनेक वर्षापासून औरंगाबाद येथे राहत होते. सणानिमित्त त्यांचे गावाकडे येणे व्हायचे. दोन दिवसांपूर्वी मूळ गावी जाफ्राबाद येथे ते आले होते. दरम्यान, घरातील कर्ता पुरुष गेल्याने ओव्हर कुटुंबावर दुख: कोसळले आहे.