शेतरस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:01 AM2017-10-24T01:01:51+5:302017-10-24T01:03:52+5:30
खामगाव: शेताच्या रस्त्याच्या वादातून गोंधनापूर व खामगाव येथील रहिवासी असलेल्या दोन गटामध्ये कंझारा शिवारात हाणामारी झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेताच्या रस्त्याच्या वादातून गोंधनापूर व खामगाव येथील रहिवासी असलेल्या दोन गटामध्ये कंझारा शिवारात हाणामारी झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३0 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गोंधनापूर येथील आनंद खेडकर व खामगाव शहरातील नूर कॉलनी परिसरातील डॉ. अक्तारखान जफर उलावत यांच्यामध्ये शेत रस्त्याचा जुना वाद आहे. त्यामुळे रविवारी दुपारी आनंद खेडकर व डॉ. अक्तारखान जफरउलावत यांच्यामध्ये शेत रस्त्यावरून वाद होऊन त्याचे हाणामारीत पर्यावसान झाले. याबाबत आनंद विश्वनाथ खेडकर रा. गोंधनापूर यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते रविवारी दुपारी त्यांच्या शेतामध्ये जात असताना त्यांना डॉ. अकतरखान जफर उल्लाखान रा. नूर कॉलनी खामगाव हे आले व म्हणाले की हा तुझा रस्ता नाही असे म्हणून वाद घातला. यावेळी डॉ. अक्तरखान याने डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. तर अझरखान व अफरउल्लाखा या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा तक्रारीवरून आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी अप.नं.३२६/१0 कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला. दुसर्या तक्रारीमध्ये जफरउल्लाखान माजीद खान (वय ७१) रा. नूर कॉलनी खामगाव यांनी म्हटले आहे की, मी माझा मुलगा डॉ. अक्तर व दुसरा मुलगा अझरखान असे तिघे जण कंझारा येथील माझ्या शेतात सोयाबीन पिकाची काढणी करण्याकरिता गेलो असता २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १२.३0 दरम्यान आनंद विश्वनाथ खेडकर, शुभम खेडकर, प्रभाकर खेडकर, रघू खेडकर, रवी सोळंके व इतरांनी मिळून तू आमच्या शेतातला रस्त्यात आडवा का येतो, असे म्हणून गैरकायदेशीर मंडळी जमवून मला व माझ्या दोन्ही मुलांना लोखंडी रॉड व लाकडी राफ्टरने मारहाण करून जखमी केले. अशा आशयाच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी आनंद खेडकर, शुभम खेडकर, प्रभाकर खेडकरसह इतर सर्व आरोपींविरुद्ध कलम १४४, १४७, १४८, १४९, ३२४, ३२६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख यांच्या मार्गदर्शनानुसार पोउनि गाढे करीत आहेत.