धामणगाव बढे - मोताळा मार्गावर दुचाकींची समोरा समोर धडक; दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 03:07 PM2017-11-10T15:07:57+5:302017-11-10T15:10:03+5:30
धामणगाव बढे - मोताळा मार्गावर सहकार विद्यामंदिरानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने धामनगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी सोडनऊ वाजेच्या सुमारास घडला.

रिधोरा येथील कुलदीप जयसवाल त्याच्यी दुचाकी (क्रमांक : एमएच-२८-७६८९) द्वारे मोताळा येथे जात होता. दरम्यान, मलकापूर येथील योगेश गजानन पठ्ठे परीक्षा देण्याच्य निमित्ताने दुचाकीवर (क्रमांक एमएच- २८-९५१२) आपल्या दोन मित्रांसह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे जात होता. दरम्यान धामगाव बढे येथील सहकार विद्यामंदीराजवळ दोन्ही दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले. कुलदीप जयसवाल याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला स्थानिक डॉक्टर के. के. वैराळकर यांनी बुलडाणा येथे रेफर केले.
गतीरोधक उभारण्याची मागणी
या मार्गावरून भरधाव वेगात वाहने धावतात. त्यामुळे येथील सहकार विद्यामंदीराजवळ दोन्ही बाजूस गतीरोधक उभारण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्रही दिले आहे. मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे आयआरसीच्या निकषात हे गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.