विनापरवाना रेती वाहतुक करणारी वाहने पकडली!
By admin | Published: July 8, 2017 01:07 AM2017-07-08T01:07:20+5:302017-07-08T01:07:20+5:30
संग्रामपूर: विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना वरवट बकाल येथे दोन रेतीची वाहने पकडल्याची घटना गुरुवारी घडली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी धनंजय गोंगटे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना वरवट बकाल येथे दोन रेतीची वाहने पकडल्याची घटना गुरुवारी घडली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी धनंजय गोंगटे यांनी केली.
उपविभागीय अधिकारी गोंगटे हे वरवट बकालकडे शासकीय दौऱ्यावर जात असताना वरवट बकाल येथे त्यांना दोन ट्रॅक्टर विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असताना दिसून आले. याबाबत ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय संग्रामपूर आवारात लावण्यात आले आहे.
यामध्ये ट्रॅक्टरचालक प्रशांत लांजेवार यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० एबी ९६३७ रा. तेल्हारा, ट्रॅक्टर चालक रत्नदीप दादाराव पहुरकर रा. तेल्हारा यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० एबी ५०२० दोन्ही ट्रॅक्टरमध्ये प्रत्येकी १ ब्रास रेती विनापरवाना वाहतूक करीत असताना हे ट्रॅक्टर पकडण्यात आले असून, दोन्ही ट्रॅक्टर संग्रामपूर तहसील कार्यालयात लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.