वान, खडकपूर्णा प्रकल्प ओव्हर फ्लो
By Admin | Published: September 10, 2014 02:08 AM2014-09-10T02:08:32+5:302014-09-10T02:08:32+5:30
बुलडाणा जिल्ह्यात १२६.४0 मि.मी.पावसाची नोंद; जलाशह संपृक्त.
बुलडाणा : ढोरपगाव लघु प्रकल्प जलाशयात ८२.८३ टक्के जलसाठा निर्माण झालेला आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची स्थिती पाहता कोणत्याही क्षणी ढोरपगाव प्रकल्पाच्या सिद्धगंगा नदी पात्रात वाहून जास्तीचे पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होऊ शकतो. त्यामुळे ढोरपगाव प्रकल्पाच्या सिद्धगंगा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हय़ात १२६.४0 मि.मी.पावसाची नोंद
बुलडाणा : बुलडाणा जिल्हय़ात देऊळगावराजा येथे सर्वात जास्त ३२ मि.मी. तर सर्वांत कमी चिखली येथे २ मि.मी.पावसाची नोंद झाली असून, जिल्हय़ात एकूण १२६.४0 मि.मी.पाऊस झाला. त्याची सरासरी ९.७२ मि.मी. इतकी आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस मि.मी.मध्ये बुलडाणा ९ मि.मी., चिखली २ मि.मी., देऊळगावराजा ३२ मि.मी., मेहकर ५ मि.मी., लोणार २२ मि.मी., सिंदखेडराजा १८ मि.मी., मलकापूर ७ मि.मी., मोताळा २ मि.मी., नांदुरा ४ मि.मी., खामगाव २.४0 मि.मी., शेगाव २0 मि.मी., जळगाव जामोद ३ मि.मी., तर संग्रामपूर निरंक पावसाची नोंद करण्यात आली.