Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअर इंडिया का विकता?खासदारांचा सवाल

एअर इंडिया का विकता?खासदारांचा सवाल

एअर इंडियाच्या खासगीकरणाविषयी खासदारांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. एअर इंडियाचे खासगीकरण का करता, विक्री करण्यापूर्वी कर्मचाºयांची भूमिका विचारात घेतली का, खासगीकरणानंतर त्यांच्या नोकरीच्या सुरक्षेचे काय, असे अनेक प्रश्न वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती या विषयांवरील संसदीय समितीने उपस्थित केले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:40 AM2017-08-11T00:40:47+5:302017-08-11T11:22:24+5:30

एअर इंडियाच्या खासगीकरणाविषयी खासदारांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. एअर इंडियाचे खासगीकरण का करता, विक्री करण्यापूर्वी कर्मचाºयांची भूमिका विचारात घेतली का, खासगीकरणानंतर त्यांच्या नोकरीच्या सुरक्षेचे काय, असे अनेक प्रश्न वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती या विषयांवरील संसदीय समितीने उपस्थित केले आहेत.

Air India's wages? The question of MPs | एअर इंडिया का विकता?खासदारांचा सवाल

एअर इंडिया का विकता?खासदारांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या खासगीकरणाविषयी खासदारांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. एअर इंडियाचे खासगीकरण का करता, विक्री करण्यापूर्वी कर्मचाºयांची भूमिका विचारात घेतली का, खासगीकरणानंतर त्यांच्या नोकरीच्या सुरक्षेचे काय, असे अनेक प्रश्न वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती या विषयांवरील संसदीय समितीने उपस्थित केले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, टीएमसी खासदार मुकुल रॉय यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीच्या बैठकीत खासदारांनी हे प्रश्न उपस्थित केले. एअर इंडियावरील ५२ हजार कोटींच्या कर्जाचा प्रश्न कसा सोडविणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारकडून कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. एअर इंडियाचे खासगीकरण का केले जात आहे, हा खासदारांचा मुख्य प्रश्न होता. त्यावर उड्डयन सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले की, एअरलाइन्सच्या वित्तीय स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला.
एअर इंडियाच्या कर्मचाºयांच्या रोजगाराचे काय, या प्रश्नावर चौबे यांनी सांगितले की, हा मुद्दा उड्डयन मंत्रालय नव्हे, तर निर्गुंतवणूक मंत्रालय हाताळेल.

पवनहंस हेलिकॉप्टर्सबद्दलही चर्चा

पवनहंस हेलिकॉप्टर्स लि. मधील (पीएचएचएल) सरकारची सर्व ५१ टक्के हिस्सेदारी विकण्याच्या सरकारच्या निर्णयावरही या वेळी चर्चा झाली. कंपनीत ४९ टक्के हिस्सेदारी ओएनजीसीच्या मालकीची आहे. या दोन्ही कंपन्या उड्डयन मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात.

Web Title: Air India's wages? The question of MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.