Lokmat Money > बिझनेस न्यूज > रत्न-आभूषण उद्योगाला प्रोत्साहन , वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही

रत्न-आभूषण उद्योगाला प्रोत्साहन , वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही

रत्न आणि आभूषण या श्रमप्रधान उद्योग क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यासह निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्न व आभूषण उद्योग क्षेत्रासोबत सल्लामसलत करून वाणिज्य मंत्रालय एका योजनेवर काम करीत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:11 AM2017-11-27T01:11:10+5:302017-11-27T01:11:36+5:30

रत्न आणि आभूषण या श्रमप्रधान उद्योग क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यासह निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्न व आभूषण उद्योग क्षेत्रासोबत सल्लामसलत करून वाणिज्य मंत्रालय एका योजनेवर काम करीत आहे

 Gems and Jewelery Industry Promotion, Commerce Minister Suresh Prabhu Guwai | रत्न-आभूषण उद्योगाला प्रोत्साहन , वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही

रत्न-आभूषण उद्योगाला प्रोत्साहन , वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही

नवी दिल्ली : रत्न आणि आभूषण या श्रमप्रधान उद्योग क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यासह निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्न व आभूषण उद्योग क्षेत्रासोबत सल्लामसलत करून वाणिज्य मंत्रालय एका योजनेवर काम करीत आहे, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
या क्षेत्राच्या वृद्धीसाठी एक संयुक्तिक योजना तयार करावी, असे वाणिज्य मंत्रालयाने रत्न आणि आभूषण उद्योग क्षेत्राला सांगण्यात आले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणखी काही आठवडे आहेत. तेव्हा कमी वेळ असल्याने या दिशेने लवकरात लवकर काम करून प्रस्तावित योजना तयार करावी लागेल, असे सुरेश प्रभू म्हणाले.
रत्न आणि आभूषण निर्यातसंवर्धन परिषदेने सोन्यावरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून ४ टक्के करण्याची मागणी केली आहे. या परिषदेच्या एका अधिकाºयाने सांगितले की, या उद्योग क्षेत्राच्या वृद्धीसाठी काय पावले उचलणे जरूरी आहे, यासाठी शिफारशी तयार करून त्या वाणिज्य मंत्रालयाकडे सादर करण्याच्या दृष्टीने ही परिषद कामाला लागली आहे. सोन्यावरील आयात शुुल्क ४ टक्के करण्याची आम्ही मागणी केली आहे. वित्तमंत्रालय आमच्या या मागणीचा जरूर विचार करील, अशी आशा आहे. तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी तसेच देशभरात रत्ने आणि आभूषण क्षेत्रासाठी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी आम्हाला सहकार्य हवे आहे. कामगार कायदेही या उद्योगाच्या दृष्टीने पूरक असावेत, अशी आमची मागणी आहे, असे या अधिकाºयाने सांगितले. सोने आयातीमुळे चालू वित्तीय तुटीच्या दृष्टीने अडचणीचे ठरत असल्याने व्यापार सूस्त आहे.
हिरे क्षेत्राबाबत प्रभू म्हणाले की, कच्चा माल पुरेसा नाही. तेव्हा हिºयांच्या खाणी पुनरुज्जीवित करण्याच्या मुद्यावर मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली
जात आहे. सध्या रशियात हिºयांचे मोठे भांडार आहे. मॉस्को भेटीदरम्यान मी कच्च्या मालाच्या मुद्यावर तेथील अधिकाºयांशी चर्चा करू, असेही प्रभू यांनी यावेळी सांगितले.

समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहन योजनांची आवश्यकता

-पीसी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक बलराम गर्ग यांनीही सोन्यावरील आयात शुल्क कमी करणे जरूरी असल्याचे मत मांडले आहे. छोट्या रत्न-आभूषण क्षेत्रातील छोट्या निर्यातदारांना सोने खरेदीत मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- या क्षेत्राचा निर्यात व्यापार वाढविण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयहीही या मुद्यावर सकारात्मक आहे. निर्यात स्थिती बरी नाही. प्रोत्साहन योजनेमुळे स्पर्धेसोबत या क्षेत्राची वृद्धीही होईल.

Web Title:  Gems and Jewelery Industry Promotion, Commerce Minister Suresh Prabhu Guwai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.