Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक लिटर पेट्रोलची किंमत 31 रुपये, पण तुमच्याकडून 79 रुपयांची वसुली

एक लिटर पेट्रोलची किंमत 31 रुपये, पण तुमच्याकडून 79 रुपयांची वसुली

गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र या काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ झालेली दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 11:34 PM2017-09-13T23:34:12+5:302017-09-13T23:34:25+5:30

गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र या काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ झालेली दिसून आली.

A liter of petrol costs Rs 31, but you get recovery of Rs 79 | एक लिटर पेट्रोलची किंमत 31 रुपये, पण तुमच्याकडून 79 रुपयांची वसुली

एक लिटर पेट्रोलची किंमत 31 रुपये, पण तुमच्याकडून 79 रुपयांची वसुली

मुंबई : गेल्या तीन वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र या काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ झालेली दिसून आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी गेल्या काही दिवसांपासून बुलेट ट्रेनप्रमाणे वेग घेतला आहे. 1 जुलैपासून 13 सप्टेंबरदरम्यान पेट्रोलचे प्रती लिटर दर 63.9 रुपयांवर 70.38 रुपयांवर पोहोचले, म्हणजेच 7 रुपये 29 पैशांनी दरात वाढ झाली आहे. तर मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर 74.30 रुपयांवरुन 79.48 रुपयांवर, म्हणजे 5.18 रुपयांनी दरात वाढ झाली.
इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम कच्चं तेल रिफाईन करतात. ह्यकॅच न्यूजह्णच्या वृत्तानुसार या कंपन्या एक लिटर कच्च्या तेलासाठी 21.50 रुपये मोजतात. त्यानंतर एंट्री टॅक्स, रिफायनरी प्रोसेस, लँडिंग कॉस्ट आणि इतर खर्च मिळून एकूण 9.34 रुपये खर्च होतात. म्हणजे एक लिटर पेट्रोल तयार करण्यासाठी 31 रुपये खर्च येतो. पण हेच एक लिटर पेट्रोल तुम्हाला 79 रुपयांमध्ये मिळतं. सरकारकडून आकारला जाणारा कर याला जबाबदार आहे. तेल कंपन्या 31 रुपयात एक लिटर पेट्रोल तयार करतात. मात्र सरकारला जाणारा कर पकडून 79 रुपये तुम्हाला या पेट्रोलसाठी मोजावे लागतात. म्हणजे जवळपास 48 रुपये तुम्ही करापोटी देता.

येत्या काही दिवसात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होणाऱ्या दरवाढीमुळे जोरदार टीका झाल्यानंतर सरकार आता खडबडून जागं झालं आहे. या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता स्थिर झाल्या आहेत. बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचं दिसून आले. त्यामुळे आता पुढेही दर कमी होतील. कारण जागतिक स्तरावरील परिस्थितीही सामान्य झाली आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तींचाही आता धोका नाही, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

Web Title: A liter of petrol costs Rs 31, but you get recovery of Rs 79

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.