Lokmat Money > बिझनेस न्यूज > एसबीआय शेतकऱ्यांना भेटणार

एसबीआय शेतकऱ्यांना भेटणार

८ जून रोजी देशातील १0 लाख शेतकऱ्यांना भेटून थेट चर्चा करण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) घेतला आहे.

By admin | Published: June 7, 2017 12:03 AM2017-06-07T00:03:59+5:302017-06-07T00:03:59+5:30

८ जून रोजी देशातील १0 लाख शेतकऱ्यांना भेटून थेट चर्चा करण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) घेतला आहे.

Meet SBI farmers | एसबीआय शेतकऱ्यांना भेटणार

एसबीआय शेतकऱ्यांना भेटणार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जविषयक गरजा नेमक्या काय आहेत, हे खरीप हंगामाच्या आधी समजून घेण्यासाठी ८ जून रोजी देशातील १0 लाख शेतकऱ्यांना भेटून थेट चर्चा करण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) घेतला आहे.
एसबीआयच्या १५,५00 ग्रामीण आणि अर्ध-ग्रामीण शाखा असून, या शाखांतच शेतकऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठकांत शेतकऱ्यांकडून नव्या कर्जासाठी अर्ज भरून घेतले जातील. तसेच कर्जाचे नूतनीकरण अथवा वाढ यासाठीही अर्ज भरून घेतले जातील, असे बँकेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (राष्ट्रीय बँकिंग समूह) रजनीश कुमार यांनी सांगितले की, येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकानुसार ठरवून दिलेल्या प्रमाणात कर्जवाटप करण्याच्या सूचना सर्व शाखांना करण्यात आल्या आहेत. परतफेड वेळेत केल्यास ३ लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी वार्षिक ४ टक्के व्याजदर आहे.

Web Title: Meet SBI farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.