>
मुंबई : अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसारख्या ई-कॉर्मस वेबसाइटस्नीदेखील ५00 आणि १000 च्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. कॅश ऑन डिलिव्हरीऐवजी ग्राहकांनी नेट बँकिंग, तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी करावी, असे आवाहन या वेबसाइटस्कडून करण्यात येत आहे. ऑनलाइन पेमेंटसोबतच कॅश ऑन डिलिव्हरीच्या पर्यायामुळे रोजच्या कपड्यांपासून टीव्ही, फ्रीजसारख्या वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे. मात्र, सरकारने ५00 आणि १000 च्या नोटा चलनातून हद्दपार केल्यानंतर, ई-कॉर्मस वेबसाइटस्नी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय काही काळासाठी बंद केला.