मुंबई/दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराशी (एनएसई) संबंधित एका ब्रोकर संस्थेच्या मुंबई आणि दिल्ली येथील मालमत्तांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. एनएसईच्या काही आजी-माजी अधिकाºयांच्या निवासस्थानांची आयकर अधिका-यांनी झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. २०११ ते २०१४ या काळात एनएसईच्या ‘को-लोकेशन सर्व्हिसेस’ सुविधेचा ठराविक ब्रोकरास पक्षपाती पद्धतीने लाभ मिळवून दिल्याच्या आरोपांसंदर्भाने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंदाच्या मे महिन्यात सेबीने अनेक अधिकारी आणि दिल्लीतील ओपीजी सेक्युरिटीज या शेअर दलाल संस्थेस नोटिसा पाठविल्या होत्या. ओपीजीला एनएसईच्या को-लोकेशन सुविधेचा प्राधान्याने लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे. सेबीच्या नोटिसा मिळालेल्या अधिकाºयांत एनएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक रवी नरैन आणि चित्रा रामकृष्णन तसेच सध्याचे एक बडे अधिकारी सुप्रभात लाला यांचा समावेश आहे.
सेबीने मंजूर केलेल्या को-लोकेशन (को-लो या लघु नावानेही ही सुविधा ओळखली जाते.) सुविधेत ब्रोकरांना एक्स्चेंजच्या व्यावसायिक सर्व्हरच्या जवळ आपले व्यावसायिक सर्व्हर लावता येते. यामुळे एक्सचेंज आणि ब्रोकरांच्या सर्व्हरवरून डाटाची देवाणघेवाण कमीत कमी वेळात होते. ही सुविधा ओपीजी सेक्युरिटीजला प्राधान्याने देण्यात आल्याचा आरोप आहे. आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, ही कारवाई सेबीच्या तपासातून पुढे आलेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आलेली नाही. अन्य स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ती करण्यात आली.
एनएसई ब्रोकर, अधिका-यांवर धाडी; आयकर विभागाने मारले छापे
राष्ट्रीय शेअर बाजाराशी (एनएसई) संबंधित एका ब्रोकर संस्थेच्या मुंबई आणि दिल्ली येथील मालमत्तांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:59 PM2017-11-17T23:59:47+5:302017-11-18T00:01:13+5:30