डंबिवली - सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती सेकंडरी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व दहावीच्या परीक्षेत आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. शालान्त परीक्षेत २७४ पैकी २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९८.९१ टक्के लागला आहे.इयत्ता सातवीचा विद्यार्थी चार्वाक नाईक हा शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २५८ गुण मिळून प्रथम आला आहे. दहावीच्या परीक्षेत साकेत ओझरकर याने ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला बेस्ट ऑफ फाइव्हमध्ये ५०० पैकी ४८७ गुण तर ६०० पैकी ५७८ गुण प्राप्त झाले आहेत. अरुण माने, देवेश जगताप आणि वरदा गोडबोले या तिघांनी ९६.८० टक्के गुण मिळवून शाळेत दुसरा येण्याचा मान मिळवला आहे. चिन्मय नाईक हा ९६.४० टक्के गुण मिळवून तिसरा तर जान्हवी गोखले हिने ९५.१७ टक्के गुण मिळवून चौथी आली आहे. चैतन्य शिंदे व पूर्वा दांडेकर यांनी ९४.५० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे. ५८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. पहिला येणारा विद्यार्थी ओझरकर याने कोणतीही खाजगी शिकवणी लावलेली नव्हती. केवळ पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे त्याला हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. (प्रतिनिधी)
सरस्वती सेकंडरी स्कूलची गुणवत्तेची परंपरा कायम
डोंबिवली - सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती सेकंडरी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व दहावीच्या परीक्षेत आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. शालान्त परीक्षेत २७४ पैकी २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९८.९१ टक्के लागला आहे.
By admin | Published: July 4, 2014 09:45 PM2014-07-04T21:45:11+5:302014-07-04T21:45:11+5:30