नवी दिल्ली: देशाच्या पहिल्या महिला पूर्ण वेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प आज सादर केला. लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सत्ता राखणाऱ्या मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या. त्यामुळेच अनेकांचं लक्ष मोदी सरकार-2 च्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे लागलं होतं. जाणून घेऊया या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे.
परवडणाऱ्या घरावरील कर्जावरील करात सूट
सध्या गृह कर्जावर 2 लाखांची सवलत मिळते. या सवलतीत आता दीड लाखांची भर पडणार आहे. यापुढे 45 लाखांचं घर खरेदी केल्यावर 3.5 लाखांची सूट मिळेल. यामुळे मध्यम वर्गाला दिलासा मिळणार आहे.
सोनं-चांदीवर करभार; दागिन्यांचं स्वप्न महाग होणार! #Budget2019https://t.co/E2xdU9Ddeo
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2019
पेट्रोल, डिझेल, सोनं महागणार
पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सोन्यासह बहुमूल्य धातूंवरील सीमा शुल्कात 2.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आधी 10 टक्के असलेलं सीमा शुल्क 12.5 टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.
पेट्रोल-डिझेल आणखी महागणार; मोदी सरकारचा सामान्यांना झटका #Budget2019https://t.co/ytfytkXVZg
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2019
रोख रक्कम काढल्यास कर
बँक खात्यातून वर्षाला 1 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम काढल्यास 2 टक्के कर द्यावा लागणार आहे. रोख रकमेतील व्यवहार कमी करुन डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
पॅन कार्डऐवजी आधार कार्ड चालणार
पॅन कार्ड नसलेल्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे ज्या ठिकाणी पॅन कार्डची माहिती मागितली जाईल, त्या ठिकाणी आधार कार्डची माहिती देता येईल. प्राप्तिकर करताना पॅन कार्ड अनिवार्य होतं. मात्र आता आधार कार्डच्या मदतीनंदेखील प्राप्तिकर भरता येऊ शकेल.