चंदीगड : टोमॅटो आणि अन्य भाज्यांच्या भावात प्रचंड वाढ झाल्यामुळे अट्टारी-वाघा सीमेवरून भारतातून पाकिस्तानला होणाऱ्या भाजीपाला निर्यातीत मोठी घट झाली आहे. या सीमेवरून दररोज ४0 ते ५0 ट्रक भाजीपाला पाकिस्तानात जात होता, तो आता ४ ते ५ ट्रकवर आला
आहे.
दरवाढीमुळे पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या वाटाणे, लसून, गाजर आणि विविध फळे यांच्यातही मोठी घट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमृतसर येथील एका निर्यातदार व्यापाऱ्याने सांगितले की, भारतातून पाकिस्तानला टोमॅटोंची निर्यात प्रामुख्याने होत होती. १५ दिवसांपूर्वीपर्यंत दररोज ४0 ते ५0 ट्रक टोमॅटो पाकिस्तानात पाठविले जात होते. टोमॅटोंचा भाव ६0 रुपयांपर्यंत वाढल्याने पाकिस्तानला टोमॅटो पाठविणे अव्यवहार्य झाले आहे.
वाहतुकीचा खर्च आणि कर लावल्यानंतर टोमॅटोंची मुद्दल किंमतच प्रचंड होऊ लागली आहे. पाकिस्तानी व्यापारी आता आपल्या देशातील टोमॅटो विकणे पसंत करू लागले आहेत. (वृत्तसंस्था)
भाजीपाला निर्यातीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, भारतातील टोमॅटोंचे भाव पाकिस्तानातील टोमॅटोंपेक्षा नेहमीच स्वस्त राहत आले आहेत.
त्यामुळे पाकिस्तानला टमाटे निर्यात करणे, लाभदायक ठरत होते. याशिवाय भारतीय टोमॅटोंचा दर्जाही उत्तम आहे.
आता भाववाढीमुळे निर्यातीचा हा व्यवसायच बसला आहे. टोमॅटोंशिवाय वाटाणे, लसूण, गाजर, खल्ली आणि फळे ही कृषी उत्पादनेही पाकिस्तानात निर्यात होत असतात.
यातील बहुतांश उत्पादने भारतात महाग झाल्यामुळे पाकिस्तानला होणाऱ्या एकूणच निर्यातीवर परिणाम झाला आहे.
महागाईमुळे पाकला होणारी भाजीपाला निर्यात घसरली
टोमॅटो आणि अन्य भाज्यांच्या भावात प्रचंड वाढ झाल्यामुळे अट्टारी-वाघा सीमेवरून भारतातून पाकिस्तानला होणाऱ्या भाजीपाला निर्यातीत मोठी घट झाली आहे. या सीमेवरून दररोज
By admin | Published: November 19, 2015 01:29 AM2015-11-19T01:29:56+5:302015-11-19T01:29:56+5:30