चंद्रपुरात २७ हजारांचे ब्राऊन शुगर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:04 PM2017-11-09T13:04:47+5:302017-11-09T13:06:30+5:30

रामनगर पोलिसांनी अष्टभुजा वॉर्डातील रमाई नगरात मंगळवारी रात्री ९ वाजता छापा टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली.

 27 thousand brown sugar seized at Chandrapur | चंद्रपुरात २७ हजारांचे ब्राऊन शुगर जप्त

चंद्रपुरात २७ हजारांचे ब्राऊन शुगर जप्त

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : दोन लाख पाच हजार ३८० रुपये ताब्यात

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी अष्टभुजा वॉर्डातील रमाई नगरात मंगळवारी रात्री ९ वाजता छापा टाकून ब्राऊन शूगरसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली.
या ३.२१० ग्रॅम ब्राऊन शुगरची किंमत २७ हजार रुपये आहे. याशिवाय दोन लाख पाच हजार ३८० रुपये रोख, दोन मोबाईल, असा एकूण दोन लाख ४३ हजार ७४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़ राजू विमल धानी (२५) रा.बंगाली कॅम्प, सोनू रमेश साव (२०) अष्टभुजा वॉर्ड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़ ही कारवाई मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत सुरूच होती़ दरम्यान आरोपींना बुधवारी दुपारी ३़३० च्या दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले़
रामनगर पोलिसांना स्थानिक अष्टभुजा वॉर्डात काही तरुण नशा करत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी सोन रमेश साव याच्या घरी धाड टाकली असता त्याठिकाणी सहा तरुण ब्राऊन शुगरचे सेवन करताना आणि सोनू साव व राजू धानी हे दोन युवक ब्राऊन शुगरची विक्री करताना आढळून आले. ब्राऊन शुगरचे सेवन करणाºया सहा युवकांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करू, अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक गोतमारे यांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या नेतृत्वात एपीआय प्रमोद बानबले प्रमोद कोटनाके, दिनकर धोबे, सुरेश धाडसे, सुरेश कसारे, बालकृष्ण पुलगामकर व अजय गिरडकर, डीबी पथकाचे बंटी बेसरकर, रूपेश पराते, पुरूषोत्तम चिकारे, राकेश निमगडे, अशोक मंजूलकर आदींनी केली.

Web Title:  27 thousand brown sugar seized at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा