चार हजार रूपयांची लाच स्वीकारताना अभियंत्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:52 PM2018-07-17T22:52:34+5:302018-07-17T22:52:51+5:30
सिंचन विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी चार हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील जिल्हा परिषद लघू सिंचन उपविभागातील शाखा अभियंता राजेश मारोतराव चिमूरकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : सिंचन विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी चार हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील जिल्हा परिषद लघू सिंचन उपविभागातील शाखा अभियंता राजेश मारोतराव चिमूरकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
‘मागेल त्याला विहिर’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांला विहिर मंजूर करण्यात आली होती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अनुदान देण्याचा नियम आहे. मात्र शाखा अभियंता राजेश चिमूरकर याने बिल काढायचे असेल तर ५० हजार रूपये द्यावे लागतील, असा तकादा लावला. दरम्यान लाभार्थ्यांने या घटनेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
तडजोडीअंती चार हजार रूपये देण्याचे तक्रारकर्त्यांने मान्य केले. आज ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभियंता राजेश चिमूरकर याला रंगेहात अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर एकोनकर, सचिन म्हेत्रे, सुभाष गोहोकार, संतोष येलपुलवार, रविकुमार ढेंगळे, राहूल ठाकरे आदींनी केली.