भारिपचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:16 PM2018-04-03T23:16:38+5:302018-04-03T23:16:38+5:30
कोरेगाव भिमा हल्ल्याचे मुख्य सुत्रधार मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला त्वरित अटक करावी, अॅट्रासिटी अॅक्टबद्दल फेरविचार करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारिप बहुजन महासंघ, तालुका व शहर महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरेगाव भिमा हल्ल्याचे मुख्य सुत्रधार मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला त्वरित अटक करावी, अॅट्रासिटी अॅक्टबद्दल फेरविचार करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारिप बहुजन महासंघ, तालुका व शहर महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कोरेगाव भिमा हल्ल्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार संभाजी भिडे असल्याचे सिद्ध झाले असूनही त्याला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे भिडेला त्वरित अटक करावी, कोरेगाव भिमा दंगल प्रकरणातील बहुजनांवरिल सर्व गुन्हे मागे घ्यावे, ओबीसी वीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, एस. सी, एस. टी, विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती द्यावी, महाविद्यालयासाठी लागू केलेले डीबीटी धोरण रद्द करावे, टीआयएसएसच्या सर्व मागण्या पूर्र्ण कराव्या, शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, संविधान दिनाच्या दिवशी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीमध्ये चुकीची प्रास्तावणा छापण्यास दोषी असणाºयांवर गुन्हे दाखल करावे, जबरानजोत धारकांना पट्टे देण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश महासचिव कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव धिरज बांबोडे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी लता साव, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश ठेंगरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष धिरज तेलंग, महासचिव सुमित मेश्राम, राजु कीर्तक, विनाश कातकर, नागेश पथाडे, रूपचंद निमगडे, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, तनुजा रायपुरे, कैविश मेश्राम, कुणाल पेटकर, विश्रांती डोगे, राजू वनकर, विलास धोटे, सुभाष डोलवे, पोर्णिमा गुलामे, सुनीता रामटेके यांच्यासह भारिपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सावली, पोंभुर्णा व चिमूरमध्ये तहसीलदारांना निवेदन
सावली येथे भारिपचे जिल्हा कोषाध्यक्ष जे.जे. नगारे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर दुपारी १ वाजता घंटानाद आंदोलन करुन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी ए.आर. दुधे, विलास माहोरकर, डॉ. महेंद्र मेश्राम, चंद्रभागा गेडाम, मायावती दमके, सुमन नगारे, सुलोचणा गेडाम, अरुणा सोमकुंवर, बंडू उंदीरवाडे, जयप्रकाश खोब्रागडे, नरेंद्र डोहणे, प्रकाश महारोकर आदी उपस्थित होते. तर पोंभुर्णा येथे डॉ. आंबेडकर चौकात घंटानाद आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष चंद्रहास उराडे, महासचिव रविंद्र तेलसे, एन.डी.थेरकर, श्याम गेडाम, इंद्रजीत खोब्रागडे, तुलाराम खोब्रागडे आदी उपस्थित होते.तर चिमूर येथे भारिप बहुजन महासंघ चिमूर तालुका शाखेच्या वतीने तालुका अध्यक्ष विनोद देठे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी नीलकंठ शेंडे, वासुदेव गायकवाड, रशिया पोपटे, सुनील येसाबरे, विकास घोंनमोडे, अनिकेत बारसागडे, भागवत बोरकर, लहू खोब्रागडे. अॅड. नामदेव मून, संघर्ष मेश्राम, अॅड. संजीवनी सातरडे, अॅड. सोडवले आदी उपस्थित होते.