लोहार समाज विकासापासून दूर
By Admin | Published: April 10, 2015 12:58 AM2015-04-10T00:58:38+5:302015-04-10T00:58:38+5:30
आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे लोहार समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे.
गुंजेवाही: आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे लोहार समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. उपजिविकेच्या व्यवसायावरच यांत्रिकीकरणाचे आक्रमण झाल्यामुळे या समाजाला आता उपासमारीच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
जिवनाचा अतिशय खडतर प्रवास या समाजाच्या वाट्याला आला आहे. यावर मात करीत घाम गाळून रात्रंदिवस मेहनत करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाच्या व्यवसायावर लोखंड आणि बिड धातूचे भाव वधारल्यामुळे कुऱ्हाड कोसळली आहे. या समाजाची भटकंती आजही कायम असून विकासाच्या प्रवाहापासून हा समाज कोसोदूर आहे. निरक्षर व अठराविश्वे दारिद्र्यात खीतपत पडलेल्या या समाजाचा व्यवसाय पूर्णत: शेती व्यवसायाशी निगळीत असून पारंपारीक आहे. आधुनिकीकरणातत शेतीसुद्धा यांत्रीक होत आहे. याचाच परिणाम लोहार समाजबांधवावर बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागत असून उपासमारीच्या झडा सोसाव्या लागत आहेत.
लोखंड आणि बिडचे भाव वधारल्याने त्यांचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील अनेक गावात शेतीशी निगडीत अवजारे तयार करुन देण्याचे काम लोहार समाज बांधव करतात.
शेती व्यवसायाला लागणारे फास, विळा, पावशी, कुऱ्हाड, नागराचीी फाड, वखराची फास, खुरपी आदी लोखंडी अवजारे बनवून उपजिविका करण्याचे काम या समाजाच्या वाट्याला आले आहे. वखरणी व नांगरणीसाठी लागणारी अवजारे शेतकरी लोहारांकडून क्वचितच विकत घेतात. याचा परिणाम लोहार समाजाच्या उपजिविकेवर झाला आहे. भटकंती करणारा समाज आजही अज्ञानपणामुळे दारिद्र्यात खितपत पडला आहे. विकास अजुनही त्यांच्या वाट्याला आला नाही. शासनाने समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संस्थानी या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)