लोकतंत्र बचाव, संविधान बचाव रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:52 PM2018-01-27T23:52:17+5:302018-01-27T23:52:39+5:30
प्रजासत्ताक दिनी जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तसेच सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था, सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅली काढण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : प्रजासत्ताक दिनी जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी तसेच सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था, सामाजिक संघटनाच्या संयुक्त विद्यमानाने लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅली काढण्यात आली.
रॅलीमध्ये खांद्यावर पालखी घेऊन संविधानाचे पुस्तक ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजता जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून लोकतंत्र बचाव-संविधान बचाव रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली कस्तुरबा मार्गे गिरनार चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली.
रॅलीचे नेतृत्त्व विधानसभा उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, सतीश वारजूरकर, हरिश्चंद्र दहिवडे, बाळू खोब्रागडे, हिरामण बोरकुटे राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्युब कछी, विदर्भ आझाद काँग्रेसचे नथमल सोनी, डी.के. आरीकर, देशक खोब्रागडे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, डॉ. रजनी हजारे, के.के. सिंग, विनोद दत्तात्रय, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, सचिन कत्याल, डॉ. विजया बांगडे, नंदा अल्लुरवार, बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर यांनी केले.
रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी लोकतंत्र बचाव-संविधान बचाव फलक हातात घेऊन भाजप सरकार हटाव, संविधान बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी रॅलीला संबोधित करताना भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा जिवतोडे, घनश्याम मुलचंदानी, महेश मेंढे, डॉ. विजय देवतळे, अॅड. मलक शाकीर, संजय रत्नपारखी, बल्लू गोहकार, संतोष लहामगे, अन्वर आलम मिर्झा आदी उपस्थित होते.