महाराजस्व अभियानात विविध २३ हजार दाखल्यांचे वाटप

By admin | Published: November 8, 2015 01:20 AM2015-11-08T01:20:35+5:302015-11-08T01:20:35+5:30

शासकीय कार्यालयातील जनतेशी निगडित असलेले कामकाज जे नियमानुसार नियमितपणे सुरू असते.

Distribution of 23,000 certificate across the Maharajasis campaign | महाराजस्व अभियानात विविध २३ हजार दाखल्यांचे वाटप

महाराजस्व अभियानात विविध २३ हजार दाखल्यांचे वाटप

Next

चंद्रपूर : शासकीय कार्यालयातील जनतेशी निगडित असलेले कामकाज जे नियमानुसार नियमितपणे सुरू असते. तेच कामकाज जलदगतीने करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाला मिळणारा प्रतिसाद व फलश्रुती विचारात घेऊन सदर अभियान नेहमीसाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात महाराजस्व अभियानात या वर्षात वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेयर व उत्पन्नाचे दाखले असे विविध २३ हजार १९४ दाखले वाटप करण्यात आले. ८०६ किलोमीटर लांबीचे ४०४ अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यात आले असून फेरफार अदालतीद्वारे १६ हजार ९११ फेरफार निकाली काढले तर एक हजार ६० गावात चावडी वाचनातून जनतेच्या समस्या निकाली काढण्यात आल्या.
या अभियानांतर्गत नागरिकांच्या समस्या दूर झाल्या नसतील किंवा त्यांची वेळेवर कामे पूर्ण होत नसतील तर नागरिकांना कार्यालयात येऊन तक्रार करण्याचीसुद्धा गरज भासत नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने आॅनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी ९९७०००१३१२ हा क्रमांक सुरू केलेला असून यावर एसएमएस करण्यासाठी कुठलाही कालावधी दिलेला नाही. त्यामुळे नागरिक केव्हाही आणि कुठूनही घरबसल्या एसएमएस करून आपली तक्रार नोंदवू शकतात. तसेच या कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना कोणत्या अधिकाऱ्यांकडून किती दिवसात कोणते कागदपत्रे जोडल्यास मिळतात, याची माहिती देण्यासाठी १८००३०००८८९८ हा टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे.
विविध दाखले देण्याकरिता शिबिरे आयोजित करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पांदण रस्ते, शेतरस्ते, शिवरस्ते, शिवाररस्ते मोकळे करणे. एक महिन्याचेवर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे त्याकरिता मंडळ मुख्यालयी फरफार अदालत घेणे. चावडी वाचन, आदिवासी जमीनधारकांच्या जमिनीबाबत नोंदी करणे, आदिवासी जमिनी परत करण्याची मोहीम हाती घेणे इत्यादी कामे या अभियानात करण्यात येतात. समाधान योजनेंतर्गत महसूल अधिकाऱ्यांकडील अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येते. कमी जास्त पत्रकाच्या आधारे जमीन अभिलेख अद्ययावत करण्याचे कामही या अभियानात केल्या जाते. विद्यार्थी व नागरिकांना लागणारे सर्व दाखले मिळविणे आता सोपे झाले असून दाखल्यासाठी होणारी पायपीट महाराजस्व अभियानामुळे बंद झाली आहे.
महसूल प्रशासनातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात महाराजस्व अभियानात २८० शिबिर घेऊन विविध २३ हजार १९४ दाखल्याचे वाटप करण्यात आले आहे. ८०६ किलोमीटर लांबीचे ४०४ अतिक्रमति रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. फेरफार अदालतीद्वारे १६ हजार ९११ फेरफार निकाली काढण्यात आले असून १ हजार ६० गावात चावडी वाचनातून समस्या सोडविण्यात आल्या.
तलाठी कार्यालयात जाण्याचा नाही त्रास, मंडळ मुख्यालयी फेरफार करा हमखास यानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेण्यात येते. या अभियानामुळे नागरिकांना विविध सेवा तत्काळ मिळण्याची सोय झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Distribution of 23,000 certificate across the Maharajasis campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.