कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:00 AM2017-10-21T00:00:32+5:302017-10-21T00:00:41+5:30
रत्नापूर-खांडला रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले़ मात्र, कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे़ संबंधित कंत्राटदाराने डांबरीकरण न करता डागडुजी केल्याने गिट्टी उखडली़ संबंधित अधिकाºयांनी कारवाई करावी,
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : रत्नापूर-खांडला रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले़ मात्र, कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे़ संबंधित कंत्राटदाराने डांबरीकरण न करता डागडुजी केल्याने गिट्टी उखडली़ संबंधित अधिकाºयांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़
रत्नापूर-खांडला-सरांडी या रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झाले. सदर काम विभागून दोन कंत्राटदाराला देण्यात आले. त्यापैकी एका कंत्राटदाराने रत्नापूर ते पुरकेपार रस्ता फाटा तर वांगेनाला ते सरांडीपर्यंत काम पूर्ण केले. दुसºया कंत्राटदाराला हुमन प्रकल्पाच्या पाळीपासून ते वांगेनाला हा दीड किमीचा टप्पा देण्यात आला. कंत्राटदाराने या रस्त्यावर गिट्टी टाकून उन्हाळ्यामध्येच कामाला सुरुवातही केली. मात्र गिट्टीचा दर्जा निकृष्ट होता़ त्यामुळे नागरिकांनी आक्षेप घेतल्याने वरिष्ठांनी बाधंकाम थांबविले. त्यानंतर थोडाबहुत डांबराचा वापर करून डागडुजी केली. मात्र, आजही प्रत्यक्ष डांबरीकरण करण्यात न आल्याने दीड किमीच्या रस्त्यावरील गिट्टी पुन्हा उखडली़ या रस्त्याने ये-जा करणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता खांडला-सरांडी आदिवासी बहुल लोकसंख्या असलेली गावे असून जंगलांनी वेढलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजही या रस्त्यावर शासनाची एसटी बससेवा पोहचली नाही़ इतरही प्रवासाची साधने गावात नाहीत़ त्यामुळे खांडला-सरांडी वासीयांना सायकल-दुचाकी किंवा पायदळ प्रवास करावा लागतो. गावाच्या सभोवताल आणि या रस्त्याच्या दुतर्फा मोठे जंगल असून जंगलामध्ये वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्त्र पशुंचा वावर असतो़ रत्नापूरवरुन खांडला सात किमी तर सरांडी हे गाव दहा किमी असल्याने शालेय विद्यार्थी व गावकºयांना या जंगलव्याप्त रस्त्यावरुनच जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. वरिष्ठ अधिकाºयांनी या रस्त्याची चौकशी करून डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे़