संजय गांधी, श्रावणबाळ निवृत्तीवेतनात वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:37 AM2017-10-07T00:37:11+5:302017-10-07T00:37:22+5:30
मागील ३७ वर्षापूर्वी राज्य सरकारने वृद्ध महिला-पुरुष, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने ग्रस्त तसेच विधवा, निराधारांसाठी संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सुरु केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील ३७ वर्षापूर्वी राज्य सरकारने वृद्ध महिला-पुरुष, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने ग्रस्त तसेच विधवा, निराधारांसाठी संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना सुरु केली. मात्र इकते वर्ष लोटूनही या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या निवृत्ती वेतनात वाढ कराण्याची मागणी अखिल भारत अनुसूचित जाती परिषद तथा जनजाती कर्मचारी परिषद जिल्हा शाखेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
३७ वर्षापूर्वी पासून संजय गांधी निराधार निवृत्ती वेतन प्रतिमाह ६०० रुपये व श्रावण बाळ निराधार निवृत्ती वेतन प्रति महा ६०० रुपये देण्यात येत आहे. या अल्पशा वेतनामध्ये एका व्यक्तीचे जगणे वाढत्या महागाईमुळे कठीण झाले आहे. मध्यतंरी शासनाने अंशत: वाढ केली. परंतु मिळणारे निवृत्ती वेतन आजच्या वाढत्या महागाईत तुटपुंजे आहे. त्यामुळे यामध्ये प्रति माह संजय गांधी निराधार निवृत्ती वेतनात दोन हजार व श्रावण बाळ निवृत्ती वेतन प्रति माह १८०० रुपये करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वरोरा येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांना जिल्हाध्यक्ष भा. गो. टिपले, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.शैलेंद्र जिलटे, सरचिटणीस आचार्य गौतम दारुंडे, संघटन सचिव सुखेसनी जिलटे, जनार्धन बुजाडे, सुरेश मेश्राम, मधुकर पाथाडे, अॅड. विनोद खोब्रागडे, छाया पचारे, माया भांदकर, कैलास पेंदोर, अनिश शेख, बेबी ढाले, पार्वता पेंदोर, कस्तुरा पेंदोर, सूरक किन्नाके, सिंधू मेठे, सुखू गज्जलवार, पंचफुला लालवार, कमल पाटील, लता पावणे आदींनी निवेदन दिले.