५६ वर्षांत पहिल्यांदाच विहिरी आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:14 AM2019-04-17T01:14:43+5:302019-04-17T01:15:10+5:30

तालुक्यातील चितेगाव येथील विहिरी तब्बल ५६ वर्षानंतर पहिल्यांदाच आटल्या. त्यासोबतच गावात नदीद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना देखील कुचकामी ठरली आहे. परिणामी चितेगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांनी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

For the first time in 56 years, there were wells | ५६ वर्षांत पहिल्यांदाच विहिरी आटल्या

५६ वर्षांत पहिल्यांदाच विहिरी आटल्या

Next
ठळक मुद्देचितेगावात पहिल्यांदाच भीषण पाणी टंचाई : पाण्यासाठी नागरिकांची पायपीट

राजू गेडाम।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील चितेगाव येथील विहिरी तब्बल ५६ वर्षानंतर पहिल्यांदाच आटल्या. त्यासोबतच गावात नदीद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना देखील कुचकामी ठरली आहे. परिणामी चितेगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांनी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
मूल तालुक्यातील चितेगावची लोकसंख्या १२९६ आहे. या गावात ११ विहिरी, १० बोअरवेल व नदीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जनतेनी १०० नळाचे कनेक्शन घेतले आहेत. आजपर्यंत या गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत होता. मात्र ५६ वर्षानंतर यावर्षी पहिल्यांदाच विहिरी पूर्णत: आटल्या. बोअरवेलच्या पाण्याची पातळी खाली जात आहे. गावात शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ज्या विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्याच विहिर कोरडी पडल्याने शुद्ध पाण्याची योजना फसली.
गावात नदीपासून नळापासून पाणी पुरवठा करणारी योजना सुरु होती. मात्र नदीतील विहिरच पूर्णत: आटल्याने दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी हाल होताना दिसून येत आहेत. या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने पाण्याची पातळी खालावली असून नदीतील पाण्याची टाकी कोरडी पडली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
सद्यास्थितीत एप्रिल महिन्यातच चितेगाव येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असल्याने मे महिन्यात पाण्याचे मोठे संकट उद्भवण्याचे चित्र दिसून येत आहे. अशीच परिस्थीती परिसरातील गावात निर्माण होण्याअगोदर पाण्याचे नियोजन करावे, तसेच चितेगाववासियांसाठी पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी चितेगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

गावातील विहिरी आटत असल्याने पाण्याची समस्या गावात भेडसावत आहे. एवढ्या वर्षानंतर प्रथमच विहिरी आटत असल्याने भविष्याची चिंता निर्माण सतावत आहे. दैनंदिन कामासाठी देखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कपडे धुण्यासाठी गावापासून २ ते ३ किमी अंतरावरील नदीवर जावे लागत आहे.
- विमलताई पुराणे,
चितेगाव

पाण्याची पातळी खाली गेल्याने चितेगावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय योजना सुरू आहे. खासगी विहिरी अधिग्रहण करून पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- सुजित येरोजवार,
ग्रामसेवक, चितेगाव
 

Web Title: For the first time in 56 years, there were wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.