हिमोग्लोबीन सॅटेलाईट केंद्र वरदान ठरणार

By admin | Published: October 24, 2015 12:27 AM2015-10-24T00:27:34+5:302015-10-24T00:27:34+5:30

इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च नवी दिल्ली यांच्याकडून चालविले जाणारे हिमोग्लोबीन सॅटेलाईट सेंटरचा शुभारंभ ...

Hemoglobin satellite center will be a boon | हिमोग्लोबीन सॅटेलाईट केंद्र वरदान ठरणार

हिमोग्लोबीन सॅटेलाईट केंद्र वरदान ठरणार

Next

हंसराज अहीर : २५ आॅक्टोबरला शुभारंभ
चंद्रपूर : इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च नवी दिल्ली यांच्याकडून चालविले जाणारे हिमोग्लोबीन सॅटेलाईट सेंटरचा शुभारंभ विदर्भात प्रथमच चंद्रपुरात २५ आॅक्टोबरला होत आहे. या क्षेत्रातील रूग्णांची गरज लक्षात घेता हे केंद्र वरदार ठरणारत आहे, असा आशावाद केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात २५ आॅक्टोबरला या केंद्राचे उद्घाटन होत आहे. विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदीया, नागपूर हा सिकलसेलच्या दृष्टीने संवेदनशील पट्ट म्हणून ओळखला जातो. या रूग्णांचे प्रमाण लक्षात घेता उपचार आणि निदान व्हावे यासाठी या केंद्राची स्थापना चंद्रपुरात करण्यात आल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. विदर्भातील जिल्ह्यांसह आंध्र प्रदेशातील नागरिकांनाही या केंद्राचा लाभ होणार आहे. या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून नागरिकांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर राहणार आहे. तर ना. सुधीर मुनगंटीवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
शिबिराला तज्ज्ञ मार्गदर्शक सेवा देणार आहेत.

Web Title: Hemoglobin satellite center will be a boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.