वृक्षलागवड करून ते जगवणेही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:30 PM2018-06-29T23:30:42+5:302018-06-29T23:31:07+5:30

वृक्ष लावण्याचा संकल्प सर्वच करतात. मात्र ती जगवली जात नाही. त्याची निगा राखणे, ही पालिकेचीच जबाबदारी आहे, असा अनेकांचा समज आहे. पण यावर्षी वृक्ष जगवण्याची जबाबदारी घेतल्यावर झाडाचा फोटो दर तीन महिन्यांनी घेत त्याला जिओ टॅग करून मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.

It is also important to live by tree plantation | वृक्षलागवड करून ते जगवणेही महत्त्वाचे

वृक्षलागवड करून ते जगवणेही महत्त्वाचे

Next
ठळक मुद्देमहापौरांच्या सूचना : मनपात पार पडली वृक्ष लागवड आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वृक्ष लावण्याचा संकल्प सर्वच करतात. मात्र ती जगवली जात नाही. त्याची निगा राखणे, ही पालिकेचीच जबाबदारी आहे, असा अनेकांचा समज आहे. पण यावर्षी वृक्ष जगवण्याची जबाबदारी घेतल्यावर झाडाचा फोटो दर तीन महिन्यांनी घेत त्याला जिओ टॅग करून मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.
राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. याबाबत तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात शुक्रवारी पार पडली.
बैठकीला उपमहापौर अनिल फुलझेले, गटनेते वसंत देशमुख, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, सहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक, बारई यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघ, प्रबुद्ध नागरिक संघ, चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ, गार्डन क्लब, गुड मॉर्निंग क्लब, व्यापारी वर्ग, राजपूत समाज, विविध धार्मिक स्थळांचे प्रतिनिधी, स्मार्ट सीटी क्लब, रोटरी क्लब, विदर्भ बहुद्देशीय पत्रकार संघाचे प्रतिनिधी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी विविध संस्थांच्या, नागरिकांच्या मागण्या, नियोजन, सूचनांची माहिती घेण्यात आली व त्याच्या पुर्ततेसंबंधी आवश्यक त्या सूचना महापौर व आयुक्तांनी केल्यात.
माहेरची झाडी व आनंदवन, स्मृतीवन योजना
मनपाकडून ‘माहेरची झाडी’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून गावातील कन्या विवाह होऊन बाहेर गेल्यास, त्यांचा संसार फळासारखा बहरावा, यासाठी त्या कन्यांसाठी ‘माहेरची झाडी’ असे संबोधण्यात येणार असून पालकांच्या हस्ते रोपटे लावले जाणार आहे. तसेच जन्माला येणाऱ्या बाळाच्या आनंदात तसेच सोडून जाणाºयांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष लावावे, या अपेक्षेने आनंदवन व स्मृतीवन या नावाने झाडासंबंधी योजना मनपा सुरु करणार आहे. वृक्ष लागवडीच्या या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन महापौर घोटेकर यांनी केले.

Web Title: It is also important to live by tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.