पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:28 PM2018-02-07T23:28:45+5:302018-02-07T23:29:21+5:30
यावर्षी अत्यल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणीटंचाईचे चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार येथील तहसीलदारांनी पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी एक सभा घेऊन तालुक्यातील पाणी टंचाईबाबत आढावा घेत काही सूचना दिल्या.
आॅनलाईन लोकमत
जिवती : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणीटंचाईचे चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार येथील तहसीलदारांनी पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी एक सभा घेऊन तालुक्यातील पाणी टंचाईबाबत आढावा घेत काही सूचना दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा तालुका सगळ्याच दृष्टीने अत्यंत दुर्गम म्हणून नेहमीच चर्चेत असतो. या तालुक्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असते. यावर्षी अशी स्थिती ओढवू नये, त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांना निर्देश दिले. त्यानुसार जिवती येथील तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्यासोबत तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिÞल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा घेतली. यामध्ये पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजनेबाबत निर्णय घेण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार व अभियंत्याला टंचाईग्रस्त भागात दौरे करुन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गावातील तलाठी व ग्रामसेवकांनी माहिती घेऊन सभेमध्ये सादर केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या समस्येवर आपआपले मत मांडले तसेच पाणीटंचाईपासून मुक्ती मिळविण्यासाठी कायमची उपाययोजना करण्याची मागणी या सभेत करण्यात आली. या सभेला पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, तहसीलदार व त्यांच्या कार्यालयातील चमू, परिसरातील तलाठी, सरपंच, ग्रामसेवक तसेच तालुक्यातीली जेष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.