ढोल ताशात आज श्रीला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:02 PM2018-09-22T23:02:25+5:302018-09-22T23:03:20+5:30

१२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका व जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. यादरम्यान कुठलीही अनूचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने बाहेर जिल्ह्यातूनही अतिरिक्त कुमक बोलाविली आहे. रामाळा व दाताळा मार्गावरील इरईचे पात्र हे विसर्जनस्थळ असल्याने तिथे विजेची व्यवस्था, स्वच्छता, निर्माल्यकुंड व कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Shall be lost in the tahla in today's day today | ढोल ताशात आज श्रीला निरोप

ढोल ताशात आज श्रीला निरोप

Next
ठळक मुद्देपोलिसांची करडी नजर महापालिका सज्ज गणेशभक्तांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका व जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. यादरम्यान कुठलीही अनूचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने बाहेर जिल्ह्यातूनही अतिरिक्त कुमक बोलाविली आहे. रामाळा व दाताळा मार्गावरील इरईचे पात्र हे विसर्जनस्थळ असल्याने तिथे विजेची व्यवस्था, स्वच्छता, निर्माल्यकुंड व कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
१३ सप्टेंबर मोठ्या उत्साहात जिल्हाभर गणरायाची स्थापना करण्यात आली. चंद्रपूर शहरात शंभराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री ची स्थापना केली. गणराया नागरिकांच्या घरोघरी व वॉर्डावॉर्डात असल्याने सर्वत्र भक्तीचे वातावरण पसरले होते.
रविवारी अनंत चतुर्दशी आहे. यावेळी गणरायाला निरोप दिला जाणार आहे. दाताळा मार्गावरील इरई नदीचे पात्र व रामाळा तलाव हे चंद्रपुरातील विसर्जनस्थळ आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या स्थळांची स्वच्छता केली असून त्या ठिकाणी कृत्रिम तलाव, निर्माल्य कुंड व आपातकालीन व्यवस्थेसाठी विसर्जनस्थळीच मंडप उभारले आहे.
जिल्हा प्रशासनानेही सर्व तयारी केली असून विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मचानी उभारण्यात आल्या आहेत. गांधी चौकात व जटपुरा गेटवरून मिरवणुकीतील गणेशमूर्तीवर फुलांचा वर्षाव केला जातो. याचीही तयारी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे रविवारी मिरवणुकीसाठी गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे.

या ठिकाणी आहेत कृत्रिम तलाव
महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तसेच निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात रामाळा तलाव परिसरात चार, गांधी चौक परिसरात एक, शिवाजी चौक परिसरात दोन , दाताळा रोड इरई नदी दोन , पं. दिनदयाल उपाध्याय तुकूम प्रा. शाळा परिसरात दोन, झोन क्र. ३ कार्यालय परिसरात एक, नेताजी चौक बाबुपेठ परिसरात दोन, बंगाली कॅम्प झोन आॅफिस जवळ एक, विठोबा खिडकी विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरात एक, शिवाजी चौक परिसरात दोन, लोकमान्य टिळक प्रा. शाळा पठाणपुरा रोड परिसरात एक, नटराज टॉकीज ताडोबा रोड परिसरात दोन इत्यादी ठिकाणी कृत्रिमतलाव तसेच निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युत व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रामाला तलाव हे विसर्जनाचे मुख्य केंद्र असल्याने येथे महानगरपालिकेचे सफाई कामगार तीन शिफ्टमधे कार्यरत असणार आहेत.
वैद्यकीय पथक तैनात
विसर्जनस्थळांवर विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच इथे प्रथमोपचार कक्षदेखील स्थापन करण्यात येणार आहे. महत्वाच्या विसर्जनस्थळी रुग्णवाहिकांसह डॉक्टर्स, परिचारिका, आवश्यक औषणांचा साठा, अग्निशमन दलाच्या गाड्या सज्ज ठेवल्या जाणार आहेत. उर्वरित ठिकाणी डॉक्टरांसह परिचारिका आणि कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
१८ चौकात ९० कॅमेरे
शहरात सध्या १८ चौकात सुमारे ९० कॅमेरे कार्यरत असून त्याद्वारे चंद्रपूर पोलीस शहरातील सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतात. सदर कॅमेराकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. या ठिकाणच्या कॅमेऱ्यांचे फुटेज वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मोबाईलमध्ये लाईव्ह दिसणार आहे. जेणेकरून वरिष्ठ अधिकारी कुठल्याही ठिकाणावरून कुठलेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्वत: चेक करू शकतात.
असा आहे पोलीस बंदोबस्त
पोलीस विभागाने बंदोबस्ताकरिता एक अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ६१ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ८०० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रक पथक, नक्षल विरोधी अभियान पथके, २०० गृहरक्षक आणि २०० पोलीस मित्रांनाही सज्ज केले आहे. ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याकरिता ध्वनी प्रदूषण प्रतिबंध पथके आवश्यक यंत्रणेसह नेमण्यात आले आहे.
तलाव, खाडीतील विसर्जनस्थळापूर्वी बांबूचे कुंपण
मच्छिमार संघटनेचे स्वयंसेवक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात
आरती व मूर्ती ठेवण्यासाठी विसर्जनस्थळाजवळ टेबलाची सोय
विद्युत व्यवस्थेसह जनरेटर
पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय व्यवस्था
भाविकांच्या स्वागतासाठी मंच, सूत्रसंचालक, आणि सूचना
शहरातील साथीच्या आजारांना रोखण्यासाठी फलकाद्वारे प्रबोधन
निर्माल्य वाहून नेण्याची स्वतंत्र व्यवस्था

Web Title: Shall be lost in the tahla in today's day today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.