श्री तिरुपती बालाजीचा ब्रम्होत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:47 AM2017-12-14T01:47:34+5:302017-12-14T01:47:46+5:30

चुनाळा येथील देवस्थानात श्री तिरुपती बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन १२ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने बारावा ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

Shri Tirupati Balaji's Bramhotsava | श्री तिरुपती बालाजीचा ब्रम्होत्सव

श्री तिरुपती बालाजीचा ब्रम्होत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देचुनाळा : समाजोपयोगी विविध कार्यक्रमांनी महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : चुनाळा येथील देवस्थानात श्री तिरुपती बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन १२ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने बारावा ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.
ब्रह्मोत्सवाअंतर्गत २८९ मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सलग चार दिवस चाललेल्या सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात गुरुवारी ग्रामसफाईने झाली. ग्रामस्थ, श्री संप्रदाय सेवा समितीचे सदस्य, शिवाजी विद्यालय, जि. प. मराठी, तेलगू शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि महिला बचत गटातील सदस्य सहभागी झाले होते. गावतील प्रमुख रस्ते आणि देवस्थान परिसराची स्वच्छता करून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिरात घेण्यात आले. २४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्टÑीय कार्यात सहभाग नोंदविला. ब्रह्मोत्सव सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन व प्रबोधन केले.
ब्रम्होत्सव सोहळ्यातील प्रमुख धार्मिक कार्यक्रम विजयवाडा येथील श्री यज्ञकेसरी शास्त्रपूर्ण पराशराम पठ्ठभिरामायाचार्यालू महाराज यांच्या हस्ते झाले. तेलगू भाषिकांसह इतर बालाजी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. कीर्तनकार जयश्री गावतुरे यांनी धार्मिक व सामाजिक विषयांवर मार्मिक मार्गदर्शन केले. परिसरातील गरजू आणि दिव्यांग रुग्णांना उपचाराद्वारे दृष्टी लाभावी, याकरिता दरवर्षी देवस्थान, लॉयन्स क्लब चंद्रपूर आणि सेवाग्राम येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेजच्या वतीने विनामुल्य मोतीबिंदू तपासणी तसेच कृत्रिम मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. देवस्थानास सहकार्य करणाºया देणगीदाºयांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भगवान बालाजी, लक्ष्मीदेवी व भूदेविच्या उत्सवमूर्तीची १०८ कलशासह शोभायात्रा काढण्यात आली. दरवर्षी समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर देण्याचा संकल्प मंदिरांच्या पदाधिकाºयांनी यावेळी जाहीर केला. आयोजनासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले. सर्वधर्मसमभावाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मंदिराद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवाय, गरजूंना विविध प्रकारची मदत देण्यात येईल, अशी माहिती माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिली.
शेकडो रुग्णांवर उपचार
ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे ४६० रुग्णांनी नोंदणी करुन आरोग्य उपचाराचा लाभ घेतला. डॉक्टरांनी तपासणी केलेल्या २८९ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सर्व रुग्णांना देवस्थानकडून मदत करण्यात येणार आहे. याशिवाय, चुनाळा येथून विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलींचा जावयांसह भेटवस्तु देऊन उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला.

Web Title: Shri Tirupati Balaji's Bramhotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.