वरोरा येथे भोई समाजाचा समाज प्रबोधन मेळावा
By admin | Published: September 28, 2016 12:54 AM2016-09-28T00:54:03+5:302016-09-28T00:54:03+5:30
भोई समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध क्षेत्रात सवलती आहेत. त्या सवलतीचा लाभ युवक-युवतींनी घेतला पाहिजे.
हजारो समाज बांधवांची उपस्थिती : महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराच्या जागेचेही भूमिपूजन
वरोरा : भोई समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध क्षेत्रात सवलती आहेत. त्या सवलतीचा लाभ युवक-युवतींनी घेतला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात समाजातील युवा वर्गाने एक पाऊल पुढे टाकून सवलतीचा फायदा घ्यावा. भोई समाज सोसायटी निर्माण करून छोटेमोठे उद्योग निर्माण करावे. यातून युवकांनी रोजगार उपलब्ध करून घेतले तर कोणीही बेरोजगार राहणार नाही. शहर व ग्रामीण भागातील भोई समाज बांधवांना संघटित करून समाज प्रबोधन मेळावे घेऊन समाजाला मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. संस्था व पदाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन कृष्णाजी नागपुरे यांनी केले.
वरोरा येथील साई मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित समाजप्रबोधन मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून नागपुरे बोलत होते. यावेळई मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पचारे, कोषाध्यक्ष देवराव पिंपळकर, सचिव रमेश नागपुरे, कर्मचारी संघटना अध्यक्ष देविदास गिरडे, कार्याध्यक्ष राजेंद्र तुमसरे, युवा संघटना अध्यक्ष सोमेश्वर पडगिलवार आदी उपस्थित होते. भोई समाजाचे आराद्य दैवत महर्षी वाल्मिकी देवस्थान उभारणी करण्याचे दृष्टीने जागेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वरोरा तालुका भोई समाज सेवा संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये तालुका अध्यक्ष रंजना पारशिवे, उपाध्यक्ष रवी करलुके, कोषाध्यक्ष कवडू रुयारकर, सचिव गोपाळ कामतकर, तालुका संघटक बाळू रुयारकर आदींची निवड करण्यात आली. शहर कार्यकारणीत अध्यक्ष सुलभा शिवरकर, युवा अध्यक्ष आशिष रुयारकर आदींची निवड करण्यात आली आहे. प्रास्ताविक महेश पडगिलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष रुयारकर, सागर करलुके, मारोती करलुके, कार्तिक रुयारकर, हर्षद रुयारकर, संदीप करलुके, बाळू रुयारकर, तुमराम करलुके , तुळशिराम करलूके, मनोहर पारशिवे, मारोती कामतवार, गणपत रुयारकर आदींनी सहकार्य केले. संचालन राजेंद्र तुमसरे आणि आभार आशिष रुयारकर यांनी मानले (शहर प्रतिनिधी )