तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:27 PM2019-04-13T13:27:36+5:302019-04-13T13:50:27+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये शनिवारी पहाटे मृतावस्थेत आढळली.

Tigress death in Tadoba, trapped in electrical wires | तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघिणीचा मृत्यू

तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघिणीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी घडली असावी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये शनिवारी पहाटे मृतावस्थेत आढळली. ही वाघीण तारांमध्ये दोन दिवसांपूर्वीच अडकली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील खातोडा कोअर झोनमध्ये २ वर्षांची ही वाघीण मृतावस्थेत आढळली. ती तारेच्या कुंपणात अडकली होती.  शनिवारी पहाटे ही घटना समोर आली असून या भागातील वन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. यात मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन. आर. प्रवीण यांच्यासह अनेक वनअधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे.

Web Title: Tigress death in Tadoba, trapped in electrical wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ