भाैगोलिक कोंडी, औरंगाबादमध्ये उमेदवार संदीपान भुमरे यांना करता आले नाही स्वत:ला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:02 PM2024-05-14T12:02:28+5:302024-05-14T12:04:22+5:30

महायुतीचे उमेदवार भुमरे यांना करावे लागले जालना मतदारसंघातील उमेदवाराला मतदान

Geographical problem, Aurangabad candidate Sandipan Bhumre could not cast his vote | भाैगोलिक कोंडी, औरंगाबादमध्ये उमेदवार संदीपान भुमरे यांना करता आले नाही स्वत:ला मतदान

भाैगोलिक कोंडी, औरंगाबादमध्ये उमेदवार संदीपान भुमरे यांना करता आले नाही स्वत:ला मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एक वेगळी बाब घडली. निवडणुकीच्या मैदानात असलेले महायुतीचे उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांना जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील पाचोड येथील मतदान केंद्रावर मतदान करावे लागले. भुमरे जरी औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार असले, तरी त्यांचे मतदान मात्र जालना लोकसभा मतदारसंघात असल्यामुळे त्यांची अशी भाैगोलिक कोंडी झाली.

छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण हे तालुके जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. भुमरे यांचे मतदान पैठण तालुक्यातील पाचोड येथील जि.प. शाळेतील मतदान केंद्रावर होते. त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क तेथे बजावला.

कुणी कुठे केले मतदान...?
- महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे व कुटुंबाने औरंगपुरा येथे सहपरिवार मतदान केले.
- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी खडकेश्वर येथे सहकुटुंब मतदान केले.
- खा. इम्तियाज जलील यांनी गोदावरी पब्लिक स्कूल, एन-१२ येथे सहकुटुंब मतदान केले.
- ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी धर्मवीर संभाजी विद्यालय, एन-५ येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजबनगर येथील मतदान केंद्रावर सहपरिवार मतदान केले.
- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सहकुटुंब शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय येथे मतदान केले.
- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी कोटला कॉलनीतील मतदान केंद्रावर सहपरिवार मतदान केले.

Web Title: Geographical problem, Aurangabad candidate Sandipan Bhumre could not cast his vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.