छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; समन्वयकांत तूफान हाणामारीने गोंधळ

By बापू सोळुंके | Published: March 29, 2024 12:39 PM2024-03-29T12:39:05+5:302024-03-29T12:40:59+5:30

लोकसभा उमेदवार ठरविण्याच्या बैठक आयोजनावरून समन्वयक भिडले

Rada at a Maratha community meeting in Chhatrapati Sambhajinagar; Confusion over meeting and clashes between coordinators | छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; समन्वयकांत तूफान हाणामारीने गोंधळ

छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; समन्वयकांत तूफान हाणामारीने गोंधळ

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत तुफान हाणामारीची घटना घडली. बैठक आयोजित करण्यात अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे म्हणत एका गटाने एका कार्यकर्त्याला लाथा बुक्क्यांनी तुडवले. ही घटना शहरातील मराठा मंदिर मंगल कार्यालयात घडली.

सकल सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी मराठा मंदिर मंगल कार्यालय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू असतानामध्येच एक कार्यकर्ता उठला आणि तुम्हाला ही बैठक बोलावण्याचे अधिकार कोणी दिले? तुम्ही मराठा समाजाचे मालक आहात का ?असे सवाल करीत विकी राजे पाटील या तरुण आयोजकाला बेदम मारहाण सुरुवात केली. यानंतर एकापाठोपाठ अनेकांनी त्यांना मारहाण केली. यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. बैठकीसाठी उपस्थित प्रमुख कार्यकर्ते बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले. यानंतर काही वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

Web Title: Rada at a Maratha community meeting in Chhatrapati Sambhajinagar; Confusion over meeting and clashes between coordinators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.